Onion Export : कांद्याचे २५० कंटेनर परदेशात रवाना ; अध्यादेशाच्या गोंधळाचा उत्पादक शेतकऱ्यांना फटका

चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे तीन दिवसांपासून येथील जेएनपीए बंदरात हजारो टन कांदा अडकून पडला होता.
Onion Export
Onion Exportsakal

मुंबई : चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे तीन दिवसांपासून येथील जेएनपीए बंदरात हजारो टन कांदा अडकून पडला होता. सुमारे २५० कंटेनरमधील सात हजार टन कांदा अखेर मंगळवारी (ता. ७) संध्याकाळपासून परदेशात रवाना होण्यास सुरुवात झाल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्र सरकारचा अध्यादेश ७ मेच्या संध्याकाळपर्यंत सीमा शुल्क विभागाच्या वेबसाइटवर अपडेटच झाला नसल्याने हे कंटेनर अडकून पडले होते. ऐन लोकसभा निवडणुकीतच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने केंद्राने कांदाप्रश्नी नमती भूमिका घेतली होती.

केंद्र सरकारने १५० दिवसांनी ४० टक्के निर्यात शुल्काची अट कायम ठेऊन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यासाठी ३ मे रोजी केंद्र सरकारने अध्यादेशही काढला मात्र अध्यादेश ७ मेच्या संध्याकाळपर्यंत सीमा शुल्क विभागाच्या वेबसाइटवर अपडेटच झाला नव्हता त्यामुळे जेएनपीए बंदरात कांद्याचे सुमारे २५० कंटेनर तीन दिवसांपासून अडकून पडले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com