"समृद्धी'साठी "एमआयडीसी'कडून 250 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई - समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळावी आणि भूसंपादनदेखील वेगाने व्हावे म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने आज राज्य रस्तेविकास महामंडळाला 250 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा धनादेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार, एमआयडीसीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रवींद्र सावंत उपस्थित होते.
Web Title: 250 Crore for Samruddhi Highway by MIDC