

26/11 Mumbai Attack
sakal
Mumbai: मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण झाली असली तरी या हल्ल्याशी संबंधित पाकिस्तानच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याची ओळख अद्याप उघड झालेली नाही. चौकशीवेळी अजमल कसाबने दिलेल्या जबाबात ‘मेजर जनरल साहब’ असा उल्लेख वारंवार आला होता. याच 'मेजर जनरल साहब'ने दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणावर देखरेख ठेवल्याचे सांगितले जाते. मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात त्याचा उल्लेख आरोपी क्रमांक २० असा आहे. तब्बल १८ वर्षांनंतरही या अधिकाऱ्याच्या नावाचे गुढ कायम राहिले आहे.