बेस्ट ताफ्यात 26 इलेक्‍ट्रिक बसगाड्या; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

बेस्ट ताफ्यात 26 इलेक्‍ट्रिक बसगाड्या; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : मुंबईकर नागरिकांना अधिक सुलभ प्रवासी सेवा देण्याच्या हेतूने 26 वातानुकूलित इलेक्‍ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नरिमन पॉईंट येथे या बसगाड्यांचे लोकार्पण झाले. विकलांग नागरिकांना बेस्टच्या बसमध्ये सुलभरीत्या चढता येण्यासाठी लिफ्ट यंत्रणा देण्यात आली आहे. 

केंद्र सरकारच्या फास्टर ऍडॉप्शन ऍन्ड मॅन्युफॅक्‍चरिंग ऑफ हायब्रिड व्हेईकल्स (फेम) योजनेअंतर्गत बेस्टला 340 बसगाड्या मंजूर झाल्या आहेत. त्यातील 26 बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. सध्या बेस्टकडे 46 इलेक्‍ट्रिक बसगाड्या असून त्यातील सहा बसगाड्या बेस्टच्या मालकीच्या आहे, तर उर्वरित भाडेतत्त्वावरील आहेत. या बसगाड्यांसाठी बॅकबे, वरळी, मालवणी, शिवाजी नगर अशा चार आगारांमध्ये चार्जिंगची सोय आहे. या वेळी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, खासदार अरविंद सावंत, बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन विभागाचे अध्यक्ष गिरीश वाघ उपस्थित होते. 

इलेक्‍ट्रिक बसचे वैशिष्ट्ये 

  • - 25 आसनांसह प्रशस्त अंतर्गत रचना 
  • - विकलांगाना बसमध्ये चढणे उतरण्यासाठी लिफ्ट यंत्रणा 
  • - मोबाईल चार्जिंग सुविधा 
  • - वायफाय हॉटस्पॉट, टेलिमॅटिक्‍स प्रणाली 
  • - सीसी टीव्ही, आयटीएस यंत्रणा 

26 electric buses in the best fleet Dedication at the hands of Uddhav Thackeray 

--------------------------------------------------------------

 ( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com