दरोड्यातील आरोपीला 26 वर्षांनंतर अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

मुंबई - 26 वर्षांपासून पोलिसांचा ससेमिरा चुकवणाऱ्या सशस्त्र दरोड्यातील एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी गोवंडी येथून अटक केली. जमशेद इमामुद्दीन पठाण (वय 48) असे त्याचे नाव आहे. कुलाबा येथील सोविनियर इमारतीतील एका घरात 10 मे 1991 ला तिघांनी सशस्त्र दरोडा टाकून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, महागडे घड्याळ असा 47 हजारांचा मुद्देमाल पळवला होता. जमशेद 26 वर्षांपासून ओळख बदलून वावरत होता. तो गोवंडीत असल्याबाबत खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून गुन्हे शाखेच्या कक्ष सहाच्या पथकाने त्याला अटक केली. 

Web Title: 26 years after the arrest of the accused in the robber arrested