26/11ची दशकपूर्ती ! मुंबई आजही त्या जख्मा अंगावर घेऊन धावत आहे

26/11ची दशकपूर्ती ! मुंबई आजही त्या जख्मा अंगावर घेऊन धावत आहे

मुंबई : दहा वर्षा पूर्वी 26/11ला पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारानी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात जवळपास 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मुंबईला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता, मुंबई पोलिसांच्या बन्दोबस्ताला एक दु:खाची किनार आहे. कारण त्या रात्री झालेल्या दहशतवादी हल्यात पोलिसांतील आपले जीवाभावाचे सहअधिकारी, कर्मचारी जवान गमावले होते. दरवर्षी 26/11 ला त्यांच्या आठवणीना उजाळा मिळत राहतोय. या अनपेक्षित दहशतवादी हल्ल्याने मुंबईसह सारा देश हादरला होता. या हल्ल्याला परतावून लावताना 
भारतमातेच्या या 18 शुरवीर सुपुत्रांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला मुंबईकर आजही विसरलेले नाहीत हेच काही मुंबईकरांशी संवाद साधल्यावर समोर आले. 

हॉटेल ओबेरॉयचे कर्मचारी प्रमोद गायकवाड़ हे या आठवणी काढ़ीत म्हणाले की, मी माझे काम संपवून ड्यूटी वरुन घरी आलो आणि काही तासांत आमच्या हॉटेलवर अतिरेकी हल्ल्याची बातमी टीव्हीवर दिसू लागली. माझ्या परिचयाच्या काही कर्मचाऱ्यांचा आणि गेस्टचा यात दुर्दैवी बळी गेला. त्या आठवणीने आजही अंगावर काटा उभा राहतो.

ATS चीफशहिद हेमंत करकरे(IPS), अशोक कामटे(IPS), एनकाउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर, तुकाराम ओम्बाळे, कैप्टन संदीप उन्नीकृष्णन, अंबादास पवार, अरुण चिट्टे, गजेंद्र सिंह, शशांक शिंदे(CST रेल्वे पोलिस निरीक्षक), बाळासाहेब भोसले, बापूसाहेब दुर्गुडे, जयवंत पाटील, एम.सी. चौधरी, विजय खांडेकर, राहूल शिंदे, पो.नि.प्रकाश मोरे, होमगार्ड मुकेश जाधव, योगेश पाटील या 18 पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत अतिरेकी हल्ला परतावत कसाबला जीवंत पकडले तर इतरांना यमसदनी पाठविले.

येथे झाला हल्ला
अजमल कसाब आणि त्याचे दहशदवादी साथीदार रात्रीच्या वेळी कफ परेड बधवार पार्क समोरील कोळीवाडयाच्या समुद्रातुन बोटीने आले. तेथून निघाले ते पंचतारांकित हॉटेल ताज, ट्राइडेंट, छाबड हाऊस, छ.शिवाजी महाराज रेल्वे स्थानक(CSMT), कामा ऑलब्लेस हॉस्पिटल, छ.शिवाजी मण्डई (मनीष मार्केट जवळ) येथे भीषण हल्ला केला. एके 47 ने गोळ्या झाड़ीत आणि ग्रेनेड बॉंम्ब फेकत एकूण 166 निष्पाप लोकांचा जीव घेतला. तर अनेकांना कायमचे जायबन्दी केले. गिरगाव चौपाटी या मार्गे निघालेला अजमल कसाब याला रोखत ASI तुकाराम ओम्बळे यांनी AK 47 च्या गोळ्या आपल्या छातीवर झेलत हुतात्मा झाले. पण त्यांनी कसाबला जेरबन्द केले होते. जगातील हा पहिलाच फिदायीन आत्मघाती हल्लेखोर जीवंतपणे पोलिसांच्या हातास लागला होता.

ताज हॉटेलमध्ये या सैतानांनी AK 47 ने गोळ्या झाडीत परदेशी पाहुणे, पर्यटक आणि भारतीयांचा जीव घेतला. हैंडग्रेनेड बॉंम्ब टाकित मोठा विध्वंस केला. तत्कालीन झोन एकचे पोलिस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिस कर्मचारी सोबत घेत अतिरेक्यांचा सामना केला त्यात पोलिस जख्मी तर झाले तर एक जन शहिद झाला.

छाबड हाऊस (इस्राइल ज्यू धर्मियांच्या प्रार्थना स्थळ, पर्यटक आश्रय स्थान, वकीलाती अधिकारी निवास, निर्वासित आश्रय स्थान) येथे बेबी मोजे यांच्या आईबाबाना अतिरेक्यांनी गोळ्याघालून मारले होते.

कामा हॉस्पिटल येथे हि हल्ला करीत गोळीबार केला. CSMT येथे कसाबने AK 47 ने ब्रश फायर करीत घरी जाण्यास उत्सुक असलेल्या रेल्वेची वाट पाहणाऱ्या प्रवाश्यांना ठार मारले. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीही पोलिस ताज, ट्रायड ट्रायडन्ट, छाबड हाऊस येथे शिरलेल्या अतिरेक्यांचा मोठ्या शर्थिने सामना करीत असताना दिल्ली वरुन NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड बटालियन ही स्पेशल फोर्स आली आणि त्यांच्या जवानांनी अतिरेक्यांचा खात्मा केला. संदीप उन्नीकृष्णन हे अधिकारी याच वेळी लढताना शहिद झाले.

26 ते 28 नोव्हेम्बर 2008 या 3 दिवसात झालेल्या हल्ल्यात 166 निष्पापांचा जीव गेला. 10 दहशतवादीं पैकी फक्त 1 अजमल कसाब जीवंत पकडला गेला तर बाकीचे 9 ठार मारण्यात आले.

आज 26/11/2018 ला या मुंबई वरील पाकिस्तानातून आलेल्या सैतानाच्या दूतांनी म्हणजेच अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला दहा वर्षे होत आहेत. मुंबईत मुंबई पोलिसांची फोर्सवन, तट रक्षक दल, NSG स्पेशल फोर्स यांचे सह आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स चोवीस तास अलर्ट आहेत. मुंबई आजही त्या हल्ल्याच्या जख्मा अंगावर घेऊन लढत आहे, धावत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांच्या अंत यात्रानी सर्व देश गहिवरला होता. मुंबईवर पसरलेली शोककळा जणू आपल्याच कुटुंबातील माणूस गेल्याचे दुःख जागोजागी लागलेल्या श्रद्धांजली फलकांनी दिसून येत होते. शहीद करकरे, कामटे, सालस्कर, ओंबले, उन्नीकृष्णन अशा 18 जनांची चायाचित्रे नाक्यानाक्यावर पहायला मिळत होती. सारी मुंबईकर जनता दुःखसागरात बुडाली होती.

मुंबईची आन-बान आणि शान असलेल्या मुंबई पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठतेमुळे मुंबईची सुरक्षा आजही टिकून आहे. मुंबईकर जनता या राष्ट्रवीर हुतात्मा पोलिसांच्या शौर्याला सर्वोच्च बलिदानाला कधीच विसरु शकणार नाही. त्यांच्या पराक्रमाची ज्योत प्रत्येक मुंबईकरांच्या हृदयात सदैव तेवत राहिल एवढे नक्कीच. जय हिंद, जय हिंद की सेना. असे माजी सैनिक किशोर आमरे म्हणाले.

दक्षिण मुंबईत विविध मोक्याच्या ठिकाणी चोख पोलिस बन्दोबस्त पहायला मिळाला. कफपरेड, कुलाबा, छ.शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल्स, कामा हॉस्पिटल, आझाद मैदान, माता रमाबाई आंबेडकर मार्ग, मेट्रो सिनेमा जंक्शन, गिरगाव चौपाटी, भेंडी बाजार, जेजे मार्ग, नागपाड़ा, डोंगरी, पायधुनी, यलोगेट, व्ही.पी.रोड, वडाला ट्रक टर्मिनल्स, शिवड़ी, माझगाव, भायखळा आदी विभागात पोलिसांचा चोख बन्दोबस्त पहायला मिळत होता.

माझगाव भाऊचा धक्का (प्रवासी बोट) येथे 26/11 च्या पूर्व संध्येला यलोगेट पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेखा कपिले या प्रत्यक्ष बंदोबस्तावर होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून महिला पोलिस अमलदारांसह, पोलिस अधिकारी-कर्मचारी प्रवाश्यांच्या सामानाची कसुन तपासणी करीत होते. येथून रेवस, मांडवा, अलीबाग आदी ठिकाणी बोटीने प्रवासी जल वाहतूक केली जाते. मुंबई पोर्टट्रस्टच्या अंतर्गत हा विभाग येतो.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com