Mumbai News I मुंबईत कस्टमची धडक कारवाई, २७ किलोंचे ड्रग्ज जप्त, एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gujarat drugs

कस्टमने धडक कारावाई करत आरोपीला अटक केली आहे.

मुंबईत कस्टमची धडक कारवाई, २७ किलोंचे ड्रग्ज जप्त, एकास अटक

मुंबई - मुंबईत २७ किलोंचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या घटनेत मास्टरमाईड असणाऱ्या आरोपीला कस्टमकडून अटक झाली आहे. मुंबईत आज कस्टमकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेतुन मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होत असल्याचा माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून कस्टमने धडक कारावाई करत आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा: रोहिणी खडसे यांची अमृता फडणवीसांवर नाव न घेता टीका, म्हणाल्या..

घटना अशी, अमेरिकेतुन मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होत असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. २७ किलो वजनाचे मारीजुआणा ड्रग्स घेऊन संबंधित आरोपी मुंबईत दाखल होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीला अनुसरुन कस्टमकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात मास्टरमाईड असणाऱ्या आरोपीला कस्टमकडून अटक झाली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेतील आरोपीच्या घरात सर्च ऑपरेशन केल्यानंतरही 20 किलो मारीजुआणा ड्रग्स आणि काही प्रमाणात हशीश ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे मुंबईतील आमली पदार्थांसंदर्भाती गुन्हेगारी वाढत आहे का असा सवाल उपस्थित होतं आहे. या मोठ्या कारवाईनंतर कस्टम अधिकारी चांगलेच कामाला लागले असून पुढील तपास सुरु आहे.

Web Title: 27 Kilo Drugs Found To Customs Officers In Mumbai One Accused Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top