

27 Villages Stir: All-Party Committee Opposes Elections
sakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील समाविष्ट २७ गावांच्या प्रश्नांकडे वर्षानुवर्षे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात आता थेट राजकीय संघर्ष उभा राहण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. केडीएमसीतील २७ गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने, निवडणूकपूर्व राजकारण चांगलेच तापले आहे.