नवी मुंबईतून २८ उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

ऐरोली १५० या विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बेलापूर १५१ या मतदारसंघातून १७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे आता नवी मुंबईतून २८ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

नवी मुंबई : नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर सोमवारी (ता.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ऐरोली विधानसभेतून २ अपक्ष व बेलापूरमधून २ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ऐरोली १५० या विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बेलापूर १५१ या मतदारसंघातून १७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे आता नवी मुंबईतून २८ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

बेलापूरमधून अपक्ष उमेदवार अनिल घोगरे व अभय दुबे, तर ऐरोलीमधून अपक्ष उमेदवार प्रीती विग व दत्तात्रय सावळे यांनी अर्ज मागे घेतला आहे.  ऐरोली विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवार रिंगणात असून भाजप-शिवसेना महायुतीचे गणेश नाईक, मनसेचे नीलेश बाणखिले, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गणेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश ढोकणे, रिपब्लिकन बहुजन सेनेचे संगीता टाकळकर, बसपाचे राजेश जयस्वाल, तसेच अपक्ष उमेदवार आता रिंगणात आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून एकूण १७ उमेदवार रिंगणात असून, भाजप-शिवसेना महायुतीचे मंदा म्हात्रे, मनसेचे गजानन काळे, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अशोक गावडे, तर अपक्ष म्हणून विजय माने रिंगणात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 candidates from Navi Mumbai for assembly election