Mumbai : राज्यातील २८ टक्के नागरिक नैराश्येत ; मानसिक आरोग्य धोक्यात; टेलिमानसवर दररोज ३८हून अधिक फोन

कोरोना काळापासून मानसिक आजार ही एक मोठी आरोग्य समस्या समोर आली आहे. त्याला तोंड देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. ‘टेलिमानस हेल्पलाइन’ ही त्यापैकीच एक आहे.
mumbai
mumbai sakal

मुंबई : कोरोना काळापासून मानसिक आजार ही एक मोठी आरोग्य समस्या समोर आली आहे. त्याला तोंड देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. ‘टेलिमानस हेल्पलाइन’ ही त्यापैकीच एक आहे. या हेल्पलाइनद्वारे मानसिक आजाराने त्रस्त नागरिकांचे समुपदेशन केले जाते. या हेल्पलाइनवर वर्षभरात ५० हजारांहून अधिक फोन आले. त्यातील आकड्यांचे मूल्यमापन केल्यास दररोजच्या १३७ पैकी सर्वाधिक ३८ फोन हे नैराश्याने ग्रस्त रुग्णांचे होते. तसेच २२ फोन हे कामाच्या ठिकाणी तणावग्रस्त लोकांचे तर विविध चिंतांनी ग्रासलेल्या नागरिकांचे २२ फोन होते.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ऑक्टोबर २०२२ मध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशात २४ तास टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक (१४४१६) सुरू करण्यात आला. मानसिक आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका वर्षात या हेल्पलाइनवर आलेल्या ५० हजारांहून अधिक फोनपैकी १४ हजार १८९ फोन नैराश्येशी संबंधित आहेत. याशिवाय सात हजार ९७२ फोन सामाजिक आणि कामाच्या ठिकाणी तणावाचे होते. सात हजार ८८५ फोन विविध प्रकारच्या चिंताग्रस्त नागरिकांचे होते. पाच हजार ३६८ फोन परीक्षेच्या तणावाचे होते.

mumbai
Samsung in Mumbai: सॅमसंगने मुंबईत सुरु केले भारतातील पहिले ऑनलाईन टू ऑफलाईन लाईफस्टाईल स्टोअर, घेता येणार AIचा अनुभव

शंकांचे निरसन

गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मानसिक अस्थिरतेचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे कोरोनानंतर मानसिक तणावाखाली असलेल्या किमान ३७ नागरिकांनी दररोज दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. मानसिक तणावाखाली असलेल्या नागरिकांच्या समस्यांवरही दूरध्वनीद्वारे उपाय सापडला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक फोन

टेलिमानस सेंटरला सर्वाधिक फोन पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या पाच हजार ६१८ फोनपैकी सर्वाधिक एक हजार ७९९ फोन कोल्हापुरातून आले आहेत. त्याअंतर्गत पुण्यातून एक हजार ७४४ , सांगलीतून एक हजार ६२९, सातारा जिल्ह्यातून ४४६ फोन आले आहेत.

टेलिमानसवर आलेले फोन

  • उदासीनता : १४, १८९

  • सामाजिक-कार्यस्थळी ताण : ७९७२

  • चिंता : ७८८५

  • इतर : ७६८०

  • परीक्षा नातेसंबंधातील समस्या : ५३६८

  • मानसोपचार : ५१३१

  • न्यूरोटिक मन : ४३१८

  • मानसिकदृष्ट्या अनुकूल स्थिती : ४१६९

  • मानसिक आरोग्याशी संबंधित नाही : ३०९५

  • वैद्यकीय आणीबाणी : २२२३

  • वृद्धांशी संबंधित विशेष समस्या : २१६

  • मुलांशी संबंधित विशेष समस्या : २००

  • महिलांशी संबंधित विशेष समस्या : १२१

  • लैंगिक समस्यांबाबत : ८७

  • कोरोनामुळे मानसिक समस्या : ३७

  • तंदुरुस्ती संबंधित : ३३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com