जुगार खेळणाऱ्या 29 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

महाड आणि खालापूर तालुक्‍यात जुगार खेळणाऱ्या 29 जणांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. गणेशोत्सवाअगोदर पालीत मोठी कारवाई करून 60 पेक्षा अधिक जुगार खेळणाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

महाड/खालापूर : महाड आणि खालापूर तालुक्‍यात जुगार खेळणाऱ्या 29 जणांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. गणेशोत्सवाअगोदर पालीत मोठी कारवाई करून 60 पेक्षा अधिक जुगार खेळणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये महाडमधील एका नगरसेवकाचा समावेश आहे. त्यामुळे जुगार अड्डामालकांचे धाबे दणाणले आहेत. 

महाड पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री महाड शहरात हॉटेल विसावा रिव्हरसाईड या ठिकाणी आणि नगरसेवक गोविंद गणपत राक्षे यांच्या घरावर छापे टाकून जुगार खेळणाऱ्यांना मुद्देमालासह अटक केली. यामध्ये नगरसेवक गोविंद राक्षे, गणेश शिगवण, विजय मोरे, प्रदीप धोंडगे, मुअज्जम कापडी, संतोष भरणे, बाळाराम कदम, बिभीषण कदम, मिलिंद शिगवण, लॉजचालक चंद्रशेखर वासू शेट्टी, उमेश शेठ, रूपेश पवार, रवींद्र इंगवले, चिनार मांडवकर यांचा समावेश आहे. 
याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार पी. एस. कापडेकर अधिक तपास करत आहेत. 

खालापूर हद्दीत मिरकूटवाडी येथील रोहिदास काशिनाथ पाटील यांच्या स्वामी समर्थ ट्रान्स्पोर्ट ऑफिसमध्ये कारवाई करून जुगार खेळणाऱ्यांना अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांना जुगाराबाबत माहिती मिळाली होती. छाप्यामध्ये रोहिदास पाटील (35, मिरकूटवाडी, खालापूर), गिरीश कुडपाणे (35, काटरंग, खोपोली), प्रशांत साळुंखे (40, रा. शेमडी), संजय पाटील (40, ठाणेन्हावे, साजगाव), सिद्धांत कडव (28, दहिवली), नीलेश वाळे (34, ठाणेन्हावे), अजिज धनसे (41, ठाणेन्हावे), संतोष पाटील (40, वडवळ), उल्हास ठाकरे (40, सांगडे), रणजित पाटील (27, वडवळ), लक्ष्मण म्हशीलकर (55, सांगडे), भिमा पवार (32, देवन्हावे), प्रणय पाटील (25, शिरवली), प्रताप देशमुख (31, नारंगी) आणि राकेश खाडे (38, ठाणे न्हावे, खालापूर) यांना अटक करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक अंबिका अंधारे करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 29 arrested for gambling