वसई-विरारलगतच्या 29 गावांचा कौल महापालिकेच्या बाजूनेच! हरकती, सूचना, निवेदनांबाबत माहिती जाहीर

संदीप पंडित
Thursday, 3 December 2020

वसई-विरार शहरातील 29 गावे महापालिकेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरार  : वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्याबाबत अनेक दिवसांपासून लढा सुरू होता. हा लढा न्यायालयातही गेलेला होता, परंतु अखेर गावांचा कौल हा महापालिकेच्या बाजूने लागल्याचे समोर आले असून गावे महापालिकेतच राहणार असल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा - सीएसएमटी रेल्वे स्थानकापुढे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा; खासदार अरविंद सावंत यांची मागणी

वसई-विरार महापालिकेतून 29 गावे वगळण्याबाबत गावकऱ्यांचा लढा सुरू होता. याबाबत 8 ऑक्‍टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायालयाने वसई-विरार क्षेत्रातून गावे वगळण्यासाठी 29 गावांसंदर्भात क्षेत्रातील घटकांशी व्यापक सल्लामसलत करून यथोचित निर्णय घेण्याचे राज्य सरकारला आदेश दिले होते, परंतु कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष सुनावणी न घेता हरकती/ सूचना/ निवेदने मागवण्याचे निर्देश कोकण आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार गावे वगळण्याच्या बाजूने 233 अर्ज व महापालिकेतून गावे न वगळण्याच्या बाजूने 9185 व 20 तटस्थ आले होते. तसेच उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ग्रामपंचायती ठेवाव्यात की नगरपालिका स्थापन कराव्यात.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्येही IIT ची पोरं मालामाल; प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज

यासाठी मागवलेल्या हरकती/ सूचना/ निवेदने यामध्ये 2708 अर्ज प्राप्त झाले होते. त्यात गावे वगळण्याच्या बाजूने चार; तर महापालिका गावे न वगळण्याच्या बाजूने 2704 अर्ज प्राप्त झाल्याने गावांचा कौल हा महापालिकेच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. याबाबत उशिराने पालिकेने माहिती जाहीर केली.

29 villages near Vasai-Virar is on the side of Municipal Corporation

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 29 villages near Vasai-Virar is on the side of Municipal Corporation