पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातात 3 ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई- पुणे ते मुंबई दरम्यानच्या द्रुतगती महामार्गावर आज (मंगळवार) सकाळी चार वाहनांचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये किमान 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 

एका वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून वेगाने येणारी वाहने त्यावर जोराने आदळली. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही प्रमाणात वाहतूक खोपोलीकडून वळविण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर खालापूरच्या जवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात धडकलेल्या वाहनांमध्ये एका कंटनेरचा समावेश आहे. यामध्ये एका कारचा चक्काचूर झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतचा अधिक तपशील प्रतीक्षेत आहे. 

Web Title: 3 dead in accident on mumbai-pune express way

फोटो गॅलरी