आईचा ताबा सुटला आणि ६ महिन्याच्या मुलीनं गमावला जीव, वाचा काय झालंय...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

मुंबई : शासनानं अनेक उपाय योजना करूनही  राज्यात अपघातांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. काल रात्री मुंबईच्या वरळीमध्ये भीषण अपघात झाला आहे. एक भरधाव कार दुभाजकावर आदळून ३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वरळीमध्ये रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कारचालक महिला तिची ६ महिन्यांची कन्या आणि तिचे नातेवाईक या कारमध्ये होते. यात या महिलेच्या ६ महिन्याच्या मुलीचा आणि २ नातेवाईकांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक महिला गंभीर जखमी झाली आहे. 

हेही वाचा: गरज नसताना तोंडाला मास्क लावून फिरणे म्हणजे आजाराला निमंत्रण, वाचा रिपोर्ट 

नक्की काय घडलं:  

या कारमध्ये एकूण ४ जण होते. वरळीतून बीएमडब्ल्यू कारनं जात असताना चालक महिलेचं कारवरचं नियंत्रण सुटलं. वेगाचा अंदाज न आल्यामुळे कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यात चालक महिला जखमी झाली तर तिची ६ महिन्याची मुलगी आणि २ नातेवाईकांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा:  वाचा काय आहे हापूस प्रेमींसाठी गोड बातमी....  

या अपघातात गाडीचा चुराडा झाला आहे. गाडी भरधाव वेगात होती आणि म्हणूनच चालक महिलेचं नियंत्रण सुटलं असावं असा प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. कार चालक महिला या अपघातात गंभीर जखमी झाली आहे आणि तिच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांकडून मिळतेय.  

3 dead including 6 months old girl in car accident at worli mumbai 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 dead including 6 months old girl in car accident at worli mumbai