बापरे! मुंबईतील तब्बल 'इतक्या' पोलिस वसाहतींमध्ये शिरला कोरोना; रेल्वे पोलिस वसाहतही विळख्यात..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

मुंबईतील 32 पोलिस वसाहतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळले आहे.यात,ताडदेव मध्ये 41 कोविड रुग्ण आढळले आहेत. तर,अंधेरी पुर्वेकडील सर्वाधिक इमारती सिल करण्यात आल्या आहेत.

मुंबई: मुंबईतील 32 पोलिस वसाहतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळले आहे.यात,ताडदेव मध्ये 41 कोविड रुग्ण आढळले आहेत. तर,अंधेरी पुर्वेकडील सर्वाधिक इमारती सिल करण्यात आल्या आहेत.

धारावीत परीसरात कोविडचा रुग्ण आढळल्या पासून मुंबई पोलिसांनी महत्वपुर्ण जबाबदारी पार केली आहे.प्रतिबंधीत क्षेत्रांचे नियोजन,लॉकडाऊनचे नियोजन अशी जबाबदारी पोलिसांवर होतीच त्याच बरोबर मुंबईच्या सर्व रस्त्यांवर उन पावसाचा मार सहन करत पोलिस दटून उभे होते. प्रतीबंधीत क्षेत्रात सतत गस्तीवर पोलिस राहात होते. तसेच,रुग्णालयांमध्येही पोलिसांचा पाहारा होता.त्यामुळे पोलिसांनाही कोरोनाची बाधा होऊ लागली आहे.

हेही वाचा: अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन, 'या' तारखेपर्यंत सर्वकाही बंद

मुंबईतील 32 पोलिस वसाहतीमध्ये कोविडचा प्रसार झाला आहे. त्यात,ताडदेव पोलिस कॅम्प मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.ही मुंबईतील सर्वात मोठी पोलिस वसाहत आहे.तर,मरोळ येथील पोलिस कॅम्प मध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. घाटकोपर रेल्वे पोलिस वसाहतीतही कोविडचे रुग्ण आढळले आहे.

अंधेरी येथील विविध ठिकाणच्या पोलिस वसाहतीतील चार ते पाच इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळले आहे. कोविडचे रुग्ण आढळल्यानंतर संबंधीत व्यक्तींचे घर,मजला किंवा इमारतीची विंग सिल करण्यता येते.ज्या वसाहतींमध्ये सार्वजनिक शौचालये आहेत ती पुर्ण इमारत प्रतिबंधीत करण्यात येते.असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: चिंताजनक ! नवी मुंबईतील 'ही' चार ठिकाणं ठरतायेत कोरोनाचे 'हॉटस्पॉट'

फोर्ट येथील माता रमाबाई आंबडेकर मार्गावरील वसाहतीत 11 रुग्ण आढळले आहेत.  मुंबई मधील पोलीस वसाहती या एक किंवा दोन खोल्याच्या आहेत.त्यामुळे ड्युटी संपवून घरी गेल्यावर पोलिसांना वेगळे राहता येत नाही. त्यामुळे पोलिस कुटुंबाना हि कोरोनाचा धोका वाढतोय. अशी तक्रार पोलीस वसाहती मधील रहिवाशी करतात.

32 police quarters have corona patients in it 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 police quarters have corona patients in it