
जळगावमध्ये पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आगीच्या अफवेनंतर भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्यानं दुसऱ्या एक्सप्रेसखाली चिरडून ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईत ३२ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्या कटु आठवणी जाग्या झाल्या. मुंबईची लाइफ लाइन असलेल्या लोकलमध्ये आग लागल्याच्या भीतीने गोंधळ उडाला होता. लेडीज स्पेशल लोकलमध्ये या गोंधळानंतर काही महिलांनी घाबरून दुसऱ्या ट्रॅकवर उड्या मारल्या. तेव्हा विरुद्ध दिशेनं येणाऱ्या लोकलखाली सापडून ४९ महिलांचा मृत्यू झाला होता. पश्चिम रेल्वे मार्गावर ही घटना घडली होती.