एमबीबीएसच्या 3,670 जागांना केंद्राची मंजुरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 3 हजार 670 जागा उपलब्ध होणार आहेत.

मुंबई - एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 3 हजार 670 जागा उपलब्ध होणार आहेत. सवर्ण आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. 

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (ता.15) केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची नवी दिल्लीत भेट घेऊन राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागासाठी विविध प्रस्ताव सादर केले. त्यापैकी अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जागा वाढवण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. या प्रस्तावानुसार सवर्ण आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत एक हजार 990 तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत 1 हजार 680 जागा उपलब्ध होणार आहेत. राज्यातील सात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांनाही केंद्राने मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्ग, नंदूरबार, सातारा, परभणी, अमरावती, नाशिक, बुलडाणा येथे ही महाविद्यालये सुरू होतील. पुणे आणि मिरज येथे विशेष पॅरामेडीकल प्रशिक्षण संस्था सुरू करण्यासही मंजुरी मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3670 MBBS seats approved