
ठाणे : ठाणे पालिका हद्दीत शुक्रवारी सर्वाधिक 20 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे ठाणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, कल्याण-डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी सहा आणि नवी मुंबईत पाच नवीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३७ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 579 वर पोहोचला आहे.
ठाण्यात शुक्रवारी 20 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या 198 वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण, डोंबिवलीत सहा नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या 114 वर गेली. तर, नवी मुंबई पालिका क्षेत्रात पाच रुग्णाची नोंद झाली असून तेथील रुग्णांची संख्या 104 इतकी झाली आहे.
मीरा भाईंदरमध्ये सहा नवीन रुग्ण
मीरा भार्इंदरमध्ये सहा नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या 120 वर पोहोचली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा 579 वर पोहोचला आहे. तर, शुक्रवारी भिवंडी पालिकेसह ठाणे ग्रामीण, अंबरनाथ, बदलापूर या भागामध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
नक्की वाचा : Fact Check : किम जोंग ऊन करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ?
महापालिका क्षेत्र आजची संख्या एकूण
37 new patients in 24 hours in Thane district The number of coronaries reached 579
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.