बेकायदेशीर 37 गाळे कडेकोट पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त

रविंद्र खरात 
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

कल्याण - कल्याण पूर्वेकडे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरात मागील अनेक वर्षापासून बेकायदेशीर 37 हुन अधिक दुकाने बांधण्यात आली होती, यामुळे रेल्वे स्थानक गाठणे ही प्रवाश्याना जिकरीचे झाले होते, तक्रारी पाहता आज शनिवार ता 6 ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तात 37 गाळे जमीनदोस्त करण्यात आले यामुळे प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला. 

कल्याण - कल्याण पूर्वेकडे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरात मागील अनेक वर्षापासून बेकायदेशीर 37 हुन अधिक दुकाने बांधण्यात आली होती, यामुळे रेल्वे स्थानक गाठणे ही प्रवाश्याना जिकरीचे झाले होते, तक्रारी पाहता आज शनिवार ता 6 ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तात 37 गाळे जमीनदोस्त करण्यात आले यामुळे प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला. 

कल्याण पूर्वेला पूनालिंक रोड वर विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन लगत अनेक दुकाने आणि घर थाटली होती यात भंगार आणि जुने सामान विक्री आणि खरेदी करणारी दुकाने होती. काही वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने रस्तारुंदीकरणामध्ये काही घरे आणि दुकाने जमीनदोस्त केली होती.

मात्र काही महिन्यात रेल्वेच्या हद्दीत टुमदार दुकाने थाटली गेली आणि व्यवसाय करू लागली. यामुळे विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक गाठणे रेल्वे प्रवाश्याना जिकरीचे झाले होते. स्टेशन मधून बाहेर पडताना प्रवाश्यांची घुसमट होत असे. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात कर्जत दिशेने पादचारी पूल बांधला मात्र उतरताना ही दुकाने अडचण निर्माण झाली होती तर स्टेशन ही दिसत नव्हते अश्या तक्रारी पाहता आज शनिवार ता 6 ऑक्टोबर रोजी सकाळी बाराच्या सुमारास रेल्वे अधिकारी वर्गाने रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित माने आणि 54 कर्मचारी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर पिंगळे आणि 55 कर्मचारी आणि शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त दत्तात्रय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 84 पोलीस कर्मचारी वर्गाच्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने 37 बेकायदेशीर गाळे जमीनदोस्त केले, यामध्ये सर्वात जास्त भंगार दुकानाचा समावेश होता. या कारवाई मुळे स्टेशन परिसराने मोकळा श्वास घेतला असून रेल्वे प्रवाश्यांची मोठी समस्या दूर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र काही महिन्यात रेल्वेच्या हद्दीत टुमदार दुकाने थाटली गेली आणि व्यवसाय करू लागली. यामुळे विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक गाठणे रेल्वे प्रवाश्याना जिकरीचे झाले होते. स्टेशन मधून बाहेर पडताना प्रवाश्यांची घुसमट होत असे .विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात कर्जत दिशेने पादचारी पूल बांधला मात्र उतरताना ही दुकाने अडचण निर्माण झाली होती तर स्टेशन ही दिसत नव्हते अश्या तक्रारी पाहता आज शनिवार ता 6 ऑक्टोबर रोजी सकाळी बाराच्या सुमारास रेल्वे अधिकारी वर्गाने रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित माने आणि 54 कर्मचारी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर पिंगळे आणि 55 कर्मचारी आणि शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त दत्तात्रय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 84 पोलीस कर्मचारी वर्गाच्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने 37 बेकायदेशीर गाळे जमीनदोस्त केले, यामध्ये सर्वात जास्त भंगार दुकानाचा समावेश होता. या कारवाई मुळे स्टेशन परिसराने मोकळा श्वास घेतला असून रेल्वे प्रवाश्यांची मोठी समस्या दूर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

विठ्ठलवाडी रेल्वेच्या हद्दीत अनधिकृत गाळे बांधण्यात आल्याने स्टेशनमध्ये जाण्यास प्रवासी वर्गाला अडचण होत होती, तक्रारी पाहता आज रेल्वे पोलीस, सुरक्षा बल आणि शहरी पोलिसांच्या मदतीने 37 गाळे जमीन दोस्त केली असल्याचे माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 37 rugged slums in front of the police