esakal | पाण्याची बाटली सोबत ठेवा, टोपी घाला, गॉगल लावा.. कारण मुंबई पेटलीये !
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याची बाटली सोबत ठेवा, टोपी घाला, गॉगल लावा.. कारण मुंबई पेटलीये !

पाण्याची बाटली सोबत ठेवा, टोपी घाला, गॉगल लावा.. कारण मुंबई पेटलीये !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : फेब्रुवारी महिना सुरू आहे , अशातच फेब्रुवारीतच मुंबईत तापमान वाढायला सुरुवात झालीये. मुंबईत सोमवारी विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आलीये. मुंबईतील काही भागांत तापमान तब्बल ३८.१ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे.

मुंबईत फेब्रुवारी महिन्यातील मागच्या १० वर्षांतील तिसरं उच्चतम तापमान असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. फेब्रुवारी महिन्यातील सामान्य तापमानाच्या तुलनेत सोमवारचं तापमान ७ अंश सेल्सियसने जास्त होतं. सांताक्रुझमध्ये ३८.१ तर कुलाब्यात ३४.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं. फेब्रुवारीतील आतापर्यंत सगळ्यात जास्त तापमान १९६६ साली ३९.६ इतकं नोंदवलं गेलं होतं.

मोठी बातमी - उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज

काय आहे तापमानवाढीचं कारण....

दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होत चालली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. अंटार्क्टिकामधल्या हिमनद्या वितळत चालल्या आहेत. समुद्राच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते अंटार्क्किटाचं वाढतं तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे.अशा पद्धतीने बर्फ वितळण्याचं प्रमाण वाढत गेलं तर जगाला याचं धोका निर्माण होऊ शकतो. अंटार्क्किटामध्ये गेल्या ५० वर्षांत इथल्या तापमानात ३ अंश सेल्सियसची वाढ झालीय. दरम्यान १३ फेब्रुवारीला अंटार्क्टिकामध्ये विक्रमी तापमानाची नोंद केली आहे. इथे तापमान १८.१ इतकं  नोंदवण्यात आलंय. बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळत चालला आहे . एकूणच संपूर्ण जगाला ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसतोय.

मोठी बातमी - शीना बोरा हत्या प्रकरण: माजी पोलिस आयुक्तांचा 'मोठा' गौप्यस्फोट..

मुंबईत वाढत चाललेल्या तापमानामुळे सामान्य नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागणार आहे. यावर्षी उन्हाळा मुंबईत चांगलाच तापणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे हेणार उन्हाळा पाहता पाण्याची बाटली सोबत ठेवा, टोपी घाला, गॉगल लावा.

38 degree Celsius temperature recorded in mumbai summer is coming

loading image
go to top