esakal | शीना बोरा हत्या प्रकरण: माजी पोलिस आयुक्तांचा 'मोठा' गौप्यस्फोट..
sakal

बोलून बातमी शोधा

शीना बोरा हत्या प्रकरण: माजी पोलिस आयुक्तांचा 'मोठा' गौप्यस्फोट..

शीना बोरा हत्या प्रकरण: माजी पोलिस आयुक्तांचा 'मोठा' गौप्यस्फोट..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या 'Let me say it now' या पुस्तकात मोठा गौप्यस्फोट केला आहे. शीना बोरा हत्या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती देण्यात आली होती असं मारिया यांनी यामध्ये म्हंटल आहे.

मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपी पीटर मुखर्जी याला वाचविण्याचा प्रयत्न राकेश मारिया यांनी  केला असा त्यांच्यावर आरोप होता. शीना बोरा हत्या प्रकरणात २०१५ मध्ये पोलिसांनी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिला अटक केली. इंद्राणीवर शीनाच्या हत्येचा आरोप होता.

मोठी बातमी - उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज...

त्यावेळी राकेश मारिया तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त होते. यादरम्यान इंद्राणी व पीटर मुखर्जी यांची चौकशी करण्यात आली होती. याचदरम्यान महाराष्ट्रात सत्तापालट झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले. या प्रकरणात झालेली चौकशी आणि तपास देवेंद्र फडणवीस यांना रुचला नाही आणि त्यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला गेला होता. 

काय लिहिलय मारिया यांच्या पुस्तकात?

या पुस्तकात राकेश मारिया यांनी त्यांच्यावरचे संपूर्ण आरोप फेटाळून लावले आहेत. "तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीतरी मुद्दाम चुकीची बातमी दिली आणि म्हणूनच माझ्यावर असे गंभीर आरोप लावण्यात येत आहेत, मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणाबाबत फक्त एकदा चर्चा केली. त्यांना सांगितले की गुन्हा घडला तेव्हा पीटर भारतात नव्हता. मात्र तो या हत्येत सहभागी आहे की नाही याचा तपास सुरू आहे. मी तत्कालीन  मुख्यमंत्र्यांना सूचित केलं होतं आणि या संदर्भात एक स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात येईल असंही सूचित केलं होतं. मात्र असं झालं नाही", असं राकेश मारिया यांनी आपलय पुस्तकात लिहिले आहे.

मोठी बातमी - तुमच्यावर नजर ठेवणारं खतरनाक 'हे' ऍप गुगलने हटवलं..

राकेश मारिया यांना आपल्यावरचे आरोप या पुस्तकात फेटाळून लावले आहेत. एखाद्या अधिकाऱ्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती देण्यात आली होती असं राकेश मारिया यांनी लिहिलय.  

ex mumbai commissioner revels may things about shina bora murder case 

loading image