Video : अरेरे! 4 गायी गेल्या वाहून, पण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पुलावरुन चार गायी वाहून गेल्या. या पुलावरुन पाच गायी चालत जात होत्या. पुलावर वेगाने पाणी वाहत होतं. पाय उचलला की पाणी त्याच्या प्रवाहासोबत गायींना वाहून नेत होतं.

पालघर : पालघर जिल्ह्यात पावसाने हाहा:कार माजवला आहे. तुफान पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. सूर्या नदीवरील धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे सूर्या नदीला पूर आल्याने डहाणू- नाशिक रस्त्यावरील पुलावर पाणी आलं. हा पूल जुना असल्याने त्यावरुन दुचाकी वाहनांची ये-जा  होत असते. सध्या या पुलावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. मात्र जनावरं किंवा गायी या पुलावर जाऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली नाही.

त्यामुळे या पुलावरुन चार गायी वाहून गेल्या. या पुलावरुन पाच गायी चालत जात होत्या. पुलावर वेगाने पाणी वाहत होतं. पाय उचलला की पाणी त्याच्या प्रवाहासोबत गायींना वाहून नेत होतं. पाच गायी एका पाठोपाठ एक जात होत्या, त्यावेळी एक- एक करुन चारही गायी प्रवाहात वाहून गेल्या. त्यामुळे एकच गाय पुलावर उरली.

इतर गायी वाहून गेल्याचे पाहून वाचलेल्या गायीने युक्ती लढवली. पुढे धोका आहे हे ओळखून ही गाय मागे वळली. अलगद-हळूवार पाय टाकत ती मागे आली आणि आपला जीव वाचवला. संकटात धीर धरुन, प्रसंगावधान दाखवणं आवश्यक असतं, हे या गायीच्या प्रसंगावरुन दिसून येतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 cows are drowning in the Surya river Palghar