खाेपाेलीत विजेचा खांब कोसळून 4 जखमी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

खाेपाेली शहरातील धोकादायक वीजखांबांची चर्चा वारंवार झाली आहे. त्यानंतरही या संदर्भात कार्यवाही झाली नाही. त्यामुळे खांब कोसळला, असा आरोप होत आहे. या घटनेतील जखमींची नावे शंकर कांबळे, सुभाष गायकवाड, जगन कांबळे अशी आहेत; तर अन्य एका जखमीचे नाव समजले नाही. शंकर हे गंभीर जखमी आहेत.

खोपोली : शहरात रेल्वेस्थानकाजवळील पुरातन श्री भैरवनाथ मंदिराजवळ पालिकेचा पदपथ दिव्याचा एक खांब बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पादचाऱ्यांच्या अंगावर कोसळला. या घटनेत चार जण जखमी झाले. त्यातील एक जण गंभीर आहे.

शहरातील धोकादायक वीजखांबांची चर्चा वारंवार झाली आहे. त्यानंतरही या संदर्भात कार्यवाही झाली नाही. त्यामुळे खांब कोसळला, असा आरोप होत आहे. या घटनेतील जखमींची नावे शंकर कांबळे, सुभाष गायकवाड, जगन कांबळे अशी आहेत; तर अन्य एका जखमीचे नाव समजले नाही. शंकर हे गंभीर जखमी आहेत.

धक्कादायक : आंतरजातीय विवाहाचा मार्ग खडतड
अपघाताची माहिती कळताच सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड, अविनाश तावडे, विशाल गायकवाड, मनोज माने, जगन्नाथ ओव्हाळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
 

हे वाचा : प्रकल्पग्रस्त आक्रमक
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या ग्रुपचे प्रवीण क्षीरसागर, रवी रोकडे, गुरुनाथ साठेलकर आणि 
खोपोली पालिका दिवाबत्ती विभागातील अधिकारी या वेळी सोबत होते. घटनेचे तीव्र पडसाद उमटले. पालिका जीर्ण आणि धोकादायक विजेचे खांब काढण्यास दिरंगाई करीत आहे, असा आरोप करून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च पालिकेने करावा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याबरोबर चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. 
 
धोकादायक खांब हटवणार 
पथदिव्याचा खांब कोसळून चार जण जखमी झाल्याच्या घटनेनंतर पालिका पथदीप विभागाचे आर. एस. सावंत यांनी धोकादायक खांब तातडीने काढून टाकण्यात येतील, असे सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 injured in collapse of pole