
मुंबईतील ससून डॉकजवळील समुद्रात एका चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस तपासात असे दिसून आले की तिचा सावत्र पिता इम्रान शेखने रागाच्या भरात तिची हत्या केली आणि मृतदेह समुद्रात फेकून दिला. या मुलीचे नाव अमायरा इम्रान शेख आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान शेख त्याच्या सावत्र मुलीच्या मोबाईलवर गेम खेळण्याच्या सवयीमुळे खूप नाराज होता.अमायरा पहाटे ३ वाजेपर्यंत मोबाईल मागत राहिली. सोमवारी रात्री इम्रान तिला दुचाकीवरून दक्षिण मुंबईत घेऊन गेला. तिथे एका निर्जन ठिकाणी त्याने मुलीचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह समुद्रात फेकून दिला.