esakal | दुपारी 12ः30 वाजे पर्यंत MMRDA परिसरातील 40 टक्के वीज पुरवठा पुर्वरत; उर्वरीत सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील
sakal

बोलून बातमी शोधा

दुपारी 12ः30 वाजे पर्यंत MMRDA परिसरातील 40 टक्के वीज पुरवठा पुर्वरत; उर्वरीत सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील

दुपारी 12ः30 पर्यंत 40 टक्के वीजपुरवठा पुर्वरत झाला आहे.

दुपारी 12ः30 वाजे पर्यंत MMRDA परिसरातील 40 टक्के वीज पुरवठा पुर्वरत; उर्वरीत सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने  मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. परंतु दुपारी 12ः30 पर्यंत 40 टक्के वीजपुरवठा पुर्वरत झाला आहे.

वीज पुरवठा खंडीत झाल्याने रुग्णालयाना तातडीने जनरेटर आणि इंधन पुरविण्याचे आदेश; महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल

  • मुंबईतील पुर्व उपनगर म्हणजेच नाहुर, भांडुप, मुलूंड, घाटकोपर, सांताक्रुझ , खार वांद्रे येथे वीजपुरवठा पुर्वरत
  • तसेच ठाणे,  नवी मुंबईतील पनवेल, वाशी, बेलापूर, खारघर परिसरात वीज पुरवठा दुपारी 12ः30 वाजता सुरळीत झाला आहे.  
  • मध्य रेल्वे मार्गावर 10.5 मिनिटाने बंद पडलेली हार्बर रेल्वे मार्ग आता 10.55 वाजताच्या दरम्यान हार्बर रेल्वे मार्ग दुपारी 12ः30 पर्यंत पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.
  • 12.26 वाजता मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन सुरू करण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे
  • दरम्यान, वीजपुरवठा खंडीत झाल्याबाबत उर्जा मंत्री नितिन राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )