समुद्राच्या खाली खोदणार 400 मिटरचे बोगदे, आजपासून सुरु होणार कोस्टल रोडचं मेगा काम

सुमित बागुल
Monday, 11 January 2021

मुंबईतील कोस्टल रोड हा शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या कोस्टल रोडसाठी दोन भुयारी बोगदे खणले जाणार आहेत.

मुंबई : मुंबईतील दक्षिण मुंबईतून पश्‍चिम उपनगरातील वांद्रे, खार, जुहू, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली या पश्‍चिम उपनगरांमध्ये जलद गतीने जाता यावे यासाठी कोस्टल रोडची उभारणी करण्यात येणार आहे. दरम्यान कोस्टल रोड बोगद्याच्या खोदकामाला आजपासून सुरुवात होणार आहे.

महत्त्वाची बातमी किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेची फिल्डिंग, अब्रुनुकसानीचा फास्ट ट्रॅक न्यायालतात दावा ?

कसा असेल कोस्टल रोड 

  • नरिमन पॉईंट ते मालाड मार्वे असा असेल कोस्टल रोडचा मार्ग 
  • कोस्टल रोडची एकूण लांबी 35 किलोमीटर असणार आहे.
  • कोस्टल रोड हा जमिनीवर, जमिनी खालून (भूमिगत), उड्डाणपूल तसेच विविध बोगद्यांमधून जाणार आहे

मुंबईतील कोस्टल रोड हा शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या कोस्टल रोडसाठी दोन भुयारी बोगदे खणले जाणार आहेत. दोन्ही भुयारे 'मावळा' या टीबीएम मशीनद्वारे खणले जाणार आहेत. अमरसन्स गार्डन प्रिन्सेस स्टिट ब्रिजपासून कोस्टल रोड उभारला जात आहे. या रोडवर दोन बोगदे असणार. याअंतर्गत कोस्टल रोडसाठी समुद्राखालून 400 मिटरचे बोगदे खोदण्याचे काम सुरू होईल. एक बोगदा खोदण्यासाठी 9 महिन्याचा कालावधी लागणार असून 18 महिन्यात कोस्टल रोडसाठी दोन बोगदे खोदून तयार होणार आहेत.

महत्त्वाची बातमी मुंबईकर आकांक्षा सोनावणेची गगनभरारी, उत्तर ध्रुवावरून प्रवास करत विमानोड्डाणाचा आगळावेगळा विक्रम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी या कामाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

400 meter tunnel to be dug under the sea mega work of Coastal Road will start


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 400 meter tunnel to be dug under the sea mega work of Coastal Road will start