Unauthorized Building : ४१ अनधिकृत इमारत प्रकरणी रहिवाशांचा भर पावसात पालिकेवर मोर्चा

आज या इमारतीमधील नागरिकांनी भर पावसात विरार येथील पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला
Unauthorized Building : ४१ अनधिकृत इमारत प्रकरणी रहिवाशांचा भर पावसात पालिकेवर मोर्चा

विरार : वसई विरार महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा सतत गाजत असतो. त्यातही सरकारी जागेवरील अतिक्रमण असेल किंवा खाजगी जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात येणाऱ्या चाली किंवा इमारतीचा मुद्दा सत्ता चर्चेत असतो. आता हि पालिका हद्दीतील अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयने दिल्यानंतर या इमारती मधील रहिवाशी हवालदिल झाले आहे. आज या इमारतीमधील नागरिकांनी भर पावसात विरार येथील पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई केली जाईल. मात्र या प्रश्नावर कुणाचेही नुकसान होऊ नये यासाठी सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल, पालिका आयुक्त अनिलकुमारपावर यांनी शिष्ट मंडळाला सांगितले आहे.

Unauthorized Building : ४१ अनधिकृत इमारत प्रकरणी रहिवाशांचा भर पावसात पालिकेवर मोर्चा
Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; नाना महालेंसह अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात

नालासोपारा येथील अग्रवाल नगरी येथे आरक्षित जागेवर ४१ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत. यासंदर्भात दाखल याचिकवेर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालायने इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामुळे हवालदिल झालेल्या रहिवाशांनी सोमवारी पालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा काढला. मोर्च्याच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली. यासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

न्यायायाच्या निर्णयानुसार कारवाई केली जाणार आहे. मात्र या प्रश्नावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित कऱण्याची तयारी आयुक्तांनी दर्शवली आहे. जागा मालक, रहिवाशी, तक्रारदार यांचे नुकसान न होता सर्वममावेशक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com