
मुंबई : राज्यात २०२० पासून मार्च २०२५ या कालावधीत १८२ वाघांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ४२० लोकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातील २५८ लोकांचा मृत्यू, हा फक्त वाघांच्या हल्ल्यात झाला आहे, असे वन विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. वन्यप्राणी व माणसातील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला चालला असून, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याची टीका होऊ लागली आहे.