४३ पुलांनी ओलांडली साठी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई - मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सुमारे ४३ पूल ६० वर्षे जुने झाले आहेत. अंधेरीतील गोखले पुलाचा भाग कोसळल्यावर मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील पुलांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अद्याप ४३ पूल वापरात असून त्यांची दुरुस्ती होईपर्यंत तरी ते धोकादायक राहणार आहेत. त्यांची दुरुस्ती कधी करणार, असा प्रश्‍न प्रवासी विचारत आहेत.

धोकादायक पुलांमध्ये १९ उड्डाणपूल आणि २४ पादचारी पुलांचा समावेश आहे. टिळक पूल, आर्थर रोड पूल आणि सायन पुलांचा त्यात समावेश आहे. रेल्वेतील पुलांच्या कालमर्यादेचा तपशील माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी रेल्वेकडे मागितला होता. त्यावर रेल्वेने पुलाची कालमर्यादा उपलब्ध नसल्याचे सांगितले. कल्याणमधील पत्री पूल आणि घाटकोपर दक्षिण दिशेकडील पूल वगळता इतर पूल सुव्यवस्थित असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

महापे, पनवेल, वाशी लिंक रोड, शीव-पनवेल महामार्ग, पाम बीच मार्ग, सीवूडस्‌, सीबीडी-बेलापूर, मानसरोवर - खांदेश्‍वर, खांदेश्‍वर - पनवेल उड्डाणपूल, सानपाडा, जुईनगर आणि नेरूळ उड्डाणपुलाची माहिती उपलब्ध नाही.

Web Title: 43 bridge 60 years old