वसई-विरार पालिकेला कोविडसाठी NUHM कडून 4.36 कोटींचे अनुदान

वसई-विरार पालिकेला कोविडसाठी NUHM कडून 4.36 कोटींचे अनुदान

मुंबईः  कोविड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने आतापर्यंत १४ कोटी रुपये खर्च केलेत. वसई-विरार महापालिकेने हा खर्च आपल्या सर्वसाधारण फंडातून खर्च केला असला तरी; 'नॅशनल अर्बन हेल्थ मिशन'अंतर्गत पालिकेला ४.९१ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. पैकी ४.३६ कोटी रुपये कोविड-१९साठी आहेत. तर कोविड काळात राज्य सरकारकडून महापालिकेला ५ कोटी रुपये प्राप्त झालेत.

25 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर वसई-विरार महापालिकेने कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले होते. यात वसईतील जी. जी कॉलेज आणि वालीव येथील वरुण इंडस्ट्रीत विलगीकरण केंद्र तयार करण्यात आली होती. सोबतच विरार-चंदनसार येथील निर्माणाधीन ट्रॉमा सेंटर कोविड रुग्णालयात परावर्तित केले होते. या विलगीकरण केंद्र आणि रुग्णालयाला लागणारी आवश्यक ती सर्व सामग्री पालिकेने खरेदी केली होती. या शिवाय कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पालिकेने डॉक्टर, नर्सेस आणि अन्य तंत्रज्ञ यांची भर्ती करून घेतली होती. या सगळ्यासोबतच औषध आणि वाहन खर्च अशा सगळ्यावर पालिकेने आतापर्यंत 14 कोटी रुपये खर्च केले आहेत.

दरम्यान, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन'अंतर्गत वसई-विरार पालिकेला 4.91 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. पैकी 4.36 कोटी रुपये कोविड-१९साठी आहेत. सप्टेंबर 30 अखेर हा निधी पालिकेकडे जमा आहे. तर राज्य सरकारने दिलेले पाच कोटी रुपये पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले आहेत. मात्र नॅशनल अर्बन हेल्थ मिशनने दिलेला निधी मिशनने दिलेल्या अटी-शर्थीनुसारच पालिकेला खर्च करावा लागणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

--------------------

(संपादनः पूजा विचारे)

4.36 crore grant from NUHM for Covid 19 Vasai Virar Municipality

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com