उत्पादन शुल्कला 46 नवीन वाहने

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध धंद्यावर अंकुश ठेवून अधिकृतरीत्या होणाऱ्या मद्य विक्रीतून महसूल वाढीसाठी 46 नवीन वाहने आज प्रदान करण्यात आली. या सर्व प्रक्रियेला गती देण्यासाठी विभागात बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, हा विभाग लवकरच अत्याधुनिक पद्धतीने ऑनलाइन करणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

विधानभवनाच्या वाहनतळ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन वाहनांचे उद्‌घाटन आणि हस्तांतरण बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री विजय देशमुख, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, आयुक्त व्ही. राधा संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या वेळी बावनकुळे म्हणाले की, या विभागात वाहनांची संख्या कमी असल्यामुळे कामावर ताण येत होता. हा विभाग अतिशय गतीने कार्य करत असून यात बदल करण्याचा प्रस्ताव ही तयार करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभाग ऑनलाइन करून सोशल मीडियाचाही वापर करण्यात येणार आहे. या विभागात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पुरस्कार सुरू करून त्यांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सुधीर श्रीवास्तव म्हणाले की, हा सोहळा छोटा असला तरी या नवीन गाड्याच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला काम करण्यासाठी नक्कीच अधिक गती येईल आणि त्याचा परिणाम मोठा होईल. या विभागात अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये टोल फ्री क्रमांक, व्हॉट्‌सऍप क्रमांक ही देण्यात आला आहे. त्यामुळे अवैध धंद्यावर कारवाईस गती आली आहे.

या वेळी टाटा मोटर्सचे अधिकारी नूर यांनी प्रतिनिधिक स्वरूपात बावनकुळे यांच्याकडे चावी दिली. या वाहनात टाटा झेस्ट मॉडेलच्या 12 कार आणि टाटा सुमोच्या 34 जीपचा समावेश आहे.

Web Title: 46 new vehicles for excise duty