''मला गर्भपाताची परवानगी द्या'' ; कोणी केली मागणी?..वाचा.. 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

मुंबई: प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या तरुणीने मुंबई उच्च न्यायालयात गर्भपात करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. सध्या अविवाहित सिंगल वुमन असल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी तीने मागितली आहे

मुंबई: प्रेम प्रकरणातून गर्भवती राहिलेल्या तरुणीने मुंबई उच्च न्यायालयात गर्भपात करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. सध्या अविवाहित सिंगल वुमन असल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी तीने मागितली आहे.

कोकणात राहणाऱ्या तेवीस वर्षीय तरुणीने न्यायालयात याचिका केली आहे. तिचे एका मुलाबरोबर प्रेम संबंध होते. त्यांच्यामध्ये सहमतीने शारीरिक संबंधही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांच्यात ब्रेक अप झाला आणि दोघेही वेगळे झाले. मात्र त्यानंतर काही दिवसांनी तरूणीला कळले की ती गर्भवती आहे. गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार वीस आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. 

हेही वाचा: सरकारी कार्यालय टप्प्याटप्प्यानं सुरू होणार, असे असतील 'नियम'

मात्र त्यानंतर गर्भपात करावयाचा असल्यास उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक आहे. याचिकादार तरुणी सध्या 23 आठवड्यांची गर्भवती आहे. अविवाहित सिंगल वुमन असल्यामुळे सामाजिक अप्रतिष्ठा होऊ शकते, त्यामुळे बाळाला सांभाळू शकत नाही, तरी गर्भपात करण्याची परवानगी द्यावी,

कायद्यानुसार अशा परिस्थितीत गर्भपात करण्याची परवानगी मिळू शकते,  अशी मागणी याचिकादाराच्या वतीने करण्यात आली. 

हेही वाचा: बॉम्बे हायकोर्ट नको, 'हे' नाव ठेवा..माजी न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात याचिका...  

याचिकेवर न्या नितीन जामदार आणि न्या नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे नुकतीच व्हिडीओ कौन्फरन्सिंगमध्ये सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकेची दखल घेऊन तातडीने तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तिचा वैद्यकीय अहवाल ईमेलद्वारे पाठविण्याचे निर्देश दिले असून पुढील सुनावणी ता. 2 जून रोजी होणार आहे.

मुंबईच्या सर्व बातम्यांसाठी इथे क्लिक करा 

give me permission of abortion pregnant girl plea to high court 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: give me permission of abortion pregnant girl plea to high court