मुंबईला दिलासा नाहीच; कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच...

मुंबईला दिलासा नाहीच; कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच...

मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी तब्बल 475 नव्या रुग्णांची भर पडली. आणखी 26 रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोव्हिड-१९ विषाणूच्या बळींची संख्या 270 झाली आहे.

मुंबईत कोरोनाचे 475 नवे रुग्ण आढळल्याने बाधितांचा आकडा 6457 वर गेला. त्यापैकी 305 रुग्णांचे बुधवारी निदान झाले, तर 170 रुग्ण 26 व 27 एप्रिलला दाखल झाल्याचे सांगण्यात आले. 26 मृतांपैकी 16 जणांना दीर्घकालीन आजार होते, तर 10 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. मृतांमध्ये 21 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 13 रुग्ण 60 वर्षांवरील आणी उर्वरित 12 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. मुंबईतील कोरोनाच्या बळींची संख्या 270 झाली आहे. एकूण 377 नवे संशयित रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 9532 संशयित रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आणखी 193 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत 1427 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. रुग्णालयांतून जाण्याची परवागी देण्यात आलेल्या रुग्णांपैकी 108 जण मुंबईबाहेरून उपचारांसाठी आले होते. 

कोव्हिड केअर सेंटर-1
कोरोनाबाधितांच्या अत्यंत निकट संपर्कातील आणि मुख्यत्वे अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करणे शक्य नसते. त्यांच्यासाठी केलेली स्थानिक क्वारंटाईन केंद्रे म्हणजे सीसी-1. सध्या 242 ठिकाणी अशी सुविधा करण्यात आली असून, 6670 व्यक्ती दाखल आहेत. या विलगीकरण केंद्रांत 17 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींवर उपचार केले जाऊ शकता.

कोव्हिड केअर सेंटर-2
कोरोनाची लक्षणे दिसत नसली, तरी बाधा झालेल्या अथवा सौम्य स्वरूपात बाधा झालेल्या व 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आणि इतर आजार नसलेल्या व्यक्तींसाठी सीसी-2 व्यवस्था आहे. सध्या अशी 84 केंद्रे असून, 1474 रुग्ण दाखल आहेत. या विलगीकरण केंद्रांची 14 हजारांपेक्षा अधिक रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता आहे. 

थोडक्यात महत्त्वाचे
निर्देशित कोविड आरोग्य केंद्रे : 9 रुग्णालये, 627 खाटा. (60 वर्षांवरील, तीव्र स्वरूपाची बाधा व इतर आजार असलेले रुग्ण).
निर्देशित कोविड रुग्णालये : 29 रुग्णालये; 2602 खाटा (अतिदक्षता उपचार आवश्यक असलेले रुग्ण).

माहितीसाठी 1916 क्रमांक
रुग्णवाहिका, रुग्णालयांतील खाटांची उपलब्धता आदी माहिती मिळवण्यासाठी 1916 या क्रमांकावर संपर्क साधावा. रुग्णांना आवश्यक माहिती पुरवली जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com