जेजे रुग्णालयात भारत बायोटेकच्या 'को-व्हॅक्सीन' लसीचे डोस, 49 जणांनी घेतली लस

मिलिंद तांबे
Sunday, 17 January 2021

भारत बायोटेकच्या 'को-व्हॅक्सीन' या कोरोनावरील लसीच्या लसीकरणाला शनिवारी जे. जे . रुग्णालयात  सुरुवात करण्यात आली.

मुंबई: भारत बायोटेकच्या 'को-व्हॅक्सीन' या कोरोनावरील लसीच्या लसीकरणाला मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जे. जे . रुग्णालयात  सुरुवात करण्यात आली. जेजे रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांना पहिली लस देण्यात आली.      

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय आणि खासगी डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे 9 लाख 63  हजार तर कोव्हॅक्सिन लशीचे 20 हजात डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्ह्यात पोहोचविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 28 हजार 500 लस देण्याचे नियोजन आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भारत बायोटेककडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येत आहे.त्यामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये आणि 2 जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.

हेही वाचा- मुंबईत आज आणि उद्या कोरोना लसीकरण स्थगित

यावेळी आमदार अमिन पटेल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता रणजीत माणकेश्वर, डीएमईआरचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आदी उपस्थित होते.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

49 people receive dose India Biotech co vaccine at JJ Hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 49 people receive dose India Biotech co vaccine at JJ Hospital