बंजारा समाजाच्या घरकुलासाठी पाच कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई - विमुक्त जाती आणि भटक्‍या जमातीच्या विकासासाठी यशवंतराव मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आली असून, घरे नसलेल्या बंजारा समाजातील कुटुंबांना या योजनेमधून घरकूल देण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठविल्यास पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री राम शिंदे यांनी केले. 

सह्याद्री अतिथीगृह येथे बारा बलुतेदार संघटना, तसेच बंजारा क्रांती दलाच्या शिष्टमंडळाच्या मागण्यांसंदर्भात प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते.

प्रा. शिंदे म्हणाले, ‘‘विमुक्त जाती व भटक्‍या जमाती समाजातील बेघरांना चांगली घरे मिळावीत, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या निकषात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना घरकूल मिळण्यास मदत होणार आहे. बंजारा समाजातील घरे नसलेल्या कुटुंबांनाही या योजनेचा फायदा घेता येणार आहे, त्यासाठी बंजारा क्रांती दलाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत.’’

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या काळात एकूण ११० कोटींची वार्षिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील विमुक्त जाती, भटक्‍या जमाती आश्रमशाळांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: 5 Crore for Banjara Society Home Ram Shinde