मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात पाच जण ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

मुंबईतील मानखुर्द मंडाळे येथुन पुण्याकडे लग्नासाठी आठ जण मारुती ओमनीने जात असताना पहाटे चारच्या सुमारास कळंबोलीपासुन सहा किलोमीटर अंतरावर ओमनी बंद पडली. बंद पडलेली ओमनी ढकलुन पुन्हा कळंबोलीच्या दिशेने आणण्याच्या प्रयत्नात असताना मुंबईच्या दिशेने कलिंगड घेऊन येणाऱ्या ट्रकने ओमनीला धडक दिली.

पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मारूती ओमनी कारला टेम्पोने दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा म्रुंत्यु झाला आहे. तर एक गंभीर जखमी आहे.

मुंबईतील मानखुर्द मंडाळे येथुन पुण्याकडे लग्नासाठी आठ जण मारुती ओमनीने जात असताना पहाटे चारच्या सुमारास कळंबोलीपासुन सहा किलोमीटर अंतरावर ओमनी बंद पडली. बंद पडलेली ओमनी ढकलुन पुन्हा कळंबोलीच्या दिशेने आणण्याच्या प्रयत्नात असताना मुंबईच्या दिशेने कलिंगड घेऊन येणाऱ्या ट्रकने ओमनीला धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघे गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांना कामोठ्यातील एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा म्रुत्यु झाला. एक जण गंभीर आहे. घटनेची नोंद खांदेश्वर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असुन, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मृतांमध्ये संतोश प्रजापती, राशीद खान, दिनेश जैसवाल, जुम्मन अली, अज्योध्या यादव यांचा समावेश असून,  रामचंद्र यादव जखमी झाले आहेत.

Web Title: 5 dead in accident on Mumbai-Pune express highway