मुंबई : सप्टेंबर महिन्यात पाच जणांचा डेंग्यूने मृत्यू 

dengue
dengue

मुंबई : पावसाळाच्या गैरहजेरीत संपूर्ण महिन्याभरात तब्बल पाच रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. तर एक रुग्णाचा लेप्टोमुळे मृत्यू झाला. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू आणि लेप्टोच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले. 

पालिकेने यंदाच्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या अहवालात, डेंग्यू व लेप्टोमुळे प्रत्येकी एका रुग्णाचा बळी गेल्याची माहिती दिली गेली होती. त्यानंतर संपूर्ण महिन्याभराचा अहवाल काल (ता. 4) पालिका आरोग्य विभागाने जाहीर केला. त्यात डेंग्यूच्या मृत्यूमध्ये चार रुग्णांची भर पडल्याची माहिती दिली गेली.

पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय मुलाचा 28 सप्टेंबर रोजी डेंग्युमुळे मृत्यू झाला. ताप आणि उलट्यांमुळे हा मुलगा आजारी होता. रक्तातील पेशी कमी झाल्याने त्याचे यकृत आणि मूत्रपिंडे निकामी झाली होती. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु उपचारात सुधारणा दिसून येत नसल्याने त्याला पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. परिणामी पालिका रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनीच त्याचा मृत्यू झाला. 28 सप्टेंबर रोजी 42 वर्षीय वाळकेश्‍वर येथील महिलेचाही डेंग्युमुळे मृत्यू झाला. तिला आठवडाभर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान डेंग्यू आणि अवयव निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाला. 

त्याअगोदर 10 सप्टेंबर रोजी 42 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. हा रुग्ण त्याच दिवशी पालिका रुग्णालयात दाखल झाला होता. त्या दिवशी रुग्णाला सारख्या उलट्या येत होत्या. दहा दिवसांपासून या रुग्णाला अशक्तरणा आणि ताप येत होता. त्याच्या शरिरातील पेशीही कमी होत असल्याचे रुग्णाने अगोदर सुुर केलेल्या तपासणी अहवालात स्पष्ट झाले होते. परंतु घरीच उपचार घेणे पसंत केल्याने या रुग्णाला वाचवणे कठीण होऊन बसले. 15 सप्टेंबर रोजी कुंभारवाड्यातील 58 वर्षीय महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. हायपरटेंशन आणि मधुमेहाची रुग्ण असलेल्या या महिलेला मूत्रसंसर्गाचाही त्रास होता. चार दिवसांपासून ताप आणि श्‍वसनाचा त्रास झाल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतर तिचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com