esakal | धक्कादायक! 24 तासांत 5 पोलिसांना कोरोनाची लागण 
sakal

बोलून बातमी शोधा

police

मुंबईत 24 तासांत पाच पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बाधित पोलिसांची संख्या 15 वर गेली आहे. राज्यभरात 23 पोलिसांना (सात अधिकारी व 16 कर्मचारी) कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 65 टक्के पोलिस मुंबईतील आहेत. 

धक्कादायक! 24 तासांत 5 पोलिसांना कोरोनाची लागण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत 24 तासांत पाच पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बाधित पोलिसांची संख्या 15 वर गेली आहे. राज्यभरात 23 पोलिसांना (सात अधिकारी व 16 कर्मचारी) कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 65 टक्के पोलिस मुंबईतील आहेत. 

मोठी बातमी : मुंबईकरांना गुड न्यूज! कोरोना रुग्णांसह मृत्युदरही घटला, जाणून घ्या आकडेवारी

मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येला दुजोरा दिला; मात्र अधिक माहिती देणे टाळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू पोलिस ठाण्यातील पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी समजले. त्याचे वास्तव्य असलेली वांद्रे पोलिस वसाहतीतील इमारत सील करण्यात आली आहे. 

नक्की वाचा : लॉकडाऊन सुरू आहे! पण तळीरामांचा हौदोस काही थांबेना... वाचा काय घडलंय

वडाळा येथील रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस वसाहतीतील एका सहायक पोलिस निरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे वास्तव्य असलेली पोलिस वसाहत सील करण्यात आली आहे. विशेष शाखा-1 येथे काम करणारा हा सहायक पोलिस निरीक्षक आणि अन्य दोन अधिकारी किडवाई मार्ग पोलिस वसाहतीत राहतात. भायखळा येथेही एका पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असल्याने तेथील पोलिस वसाहतीतील एक इमारत सील करण्यात आली. 

महत्वाची बातमी खबरदार.. प्रक्षोभक व्हिडिओ पोस्ट कराल तर थेट तुरुंगात..

एकूण 15 पोलिस वसाहतींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, आतापर्यंत सहा पोलिस वसाहती सील करण्यात आल्या आहेत. विशेष लक्ष असलेल्या पोलिस वसाहतींमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवसाआड वैद्यकीय तपासणी केली जात आहे. लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ उपचार करण्यात येत आहेत. सर्व पोलिस वसाहतींचे दरवाजे बंद करण्यात आले असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणी सुरू आहे 

हे ही वाचा : "साहेब काय तरी.. खायला द्या ओ...", हे आहे कोरोनाचं भीषण वास्तव...

20 पोलिस विलगीकरणात 
दोन दिवसांपूर्वी एक पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यानंतर जेजे मार्ग पोलिस ठाणे व डोंगरी पोलिस ठाण्यातील 20 अधिकाऱ्यांचे हॉटेल व खासगी ठिकाणी विलगीकरण करण्यात आले.

loading image
go to top