खबरदार.. प्रक्षोभक व्हिडिओ पोस्ट कराल तर थेट तुरुंगात..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असताना मागील सात दिवसांत प्रक्षोभक, समाजात दुही निर्माण करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणांत राज्यात आतापर्यंत 115 गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असताना मागील सात दिवसांत प्रक्षोभक, समाजात दुही निर्माण करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणांत राज्यात आतापर्यंत 115 गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोनाबाबत अफवा पसरवण्याचे 75 आणि चुकीची माहिती देण्याचे 24 प्रकार उघड झाले आहेत. 

महत्वाची बातमी ः मजुरांसाठी अखेर सरकार धावले

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सायबर पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहेत. व्हॉट्‌सऍपवर आक्षेपार्ह संदेश ग्रुप ऍडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे राज्य सायबर पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांनी स्पष्ट केले होते. परंतु, मागील सात दिवसांत प्रक्षोभक, आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत 115 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोठी बातमी ः राज्य आणि केंद्राबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान, म्हणालेत...

कोरोनाविषयी अफवा पसरवण्याचे 75 प्रकार आणि चुकीची माहिती देण्याचे 24 प्रकार समोर आले आहेत.  सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात सायबर पोलिसांनी राज्यभरात 210 गुन्हे नोंदवले असून, आठ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिस सध्या टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवून आहे. 

हे वाचा ः लॉकडाऊनमुळे धारावीतील बोहारणींना भविष्याची चिंता 

दाखल गुन्हे 
व्हॉट्‌सऍप फॉरवर्डस
: 102 (बीड 26, कोल्हापूर 15, पुणे ग्रामीण 11, मुंबई 10, जालना 13, सातारा 7, नांदेड 7, परभणी 7, नाशिक ग्रामीण 6, नागपूर शहर 5, नाशिक शहर 6, ठाणे शहर 5, सिंधुदुर्ग 5, बुलडाणा 4, पुणे शहर 4, गोंदिया 4, सोलापूर ग्रामीण 5, नवी मुंबई 2, उस्मानाबाद 2, ठाणे ग्रामीण 1, लातूर 4, धुळे 1). 
फेसबुक पोस्ट्‌स : 71 
टिकटॉक व्हिडीओ : 3 
ट्विटर : 3 
यूट्युब चित्रफिती : 37 
अटक : 45 
लवकरच कारवाई होणारे : 160


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police registered file against offensive post