esakal | #AareyForest पन्नासहून अधिक पर्यावरणप्रेमींना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

50 activist arrested from aarey forest

आरे कारशेड परिसरात वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमींनी शुक्रवारी रात्रीपासून रान उठवले आहे. यामध्ये शनिवारी सकाळपासून 50 हून अधिक पर्यावरण प्रेमींना पोलिसांनी अटक केली आहे.

#AareyForest पन्नासहून अधिक पर्यावरणप्रेमींना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरे कारशेड परिसरात वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमींनी शुक्रवारी रात्रीपासून रान उठवले आहे. यामध्ये शनिवारी सकाळपासून 50 हून अधिक पर्यावरण प्रेमींना पोलिसांनी अटक केली आहे. एवढेच नव्ह तर गोरेगाव चेक नाका येथे रस्ता क्राॅस असताना देखील एका महिलेला अटक केली. 

आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये शुक्रवारी रात्रभर झाडं कापण्यात येत होती. शनिवारी दुपारपर्यंत जवळपास 1500 हून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हे काम पोलिस सुरक्षेत सुरू आहे.

#AareyForest आरे आंदोलनप्रकरणी 29 जणांना अटक

यावेळी पर्यावरण प्रेमी आणि 'आरे वाचवा' मोहिमेच्या आंदोलकांना  पोलिसांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पर्यावरण प्रेमीच्या गोंधळामुळे पोलिसांनी सरळ अटक केली. यामध्ये 50 हून अधिक पर्यावरण प्रेमींना अटक करण्यात आली आहे . तसेच गोरेगाव चेक नाका येथे 200 ते 250 पोलिसांचा बंदोबस्त आहे.