साईबाबा संस्थानतर्फे 50 कोटींचा धनादेश

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

मुंबई - शिर्डी येथील साईबाबा विश्वस्त संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 कोटी रुपयांचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
Web Title: 50 Crore Rupees Demand Draft by Saibaba Sansthan Devendra Fadnavis