50 टक्के बस भंगारात! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

ठाणे - टीएमटीच्या नादुरुस्त बस ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाला; पण त्यावरून प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेवर आरोप होत असल्याने ठाण्यात राजकारण रंगू लागले आहे. नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेतला जात असताना राजकारण होत असेल तर ठेकाच रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात 50 टक्के नव्याने बस रस्त्यावर येण्याचा मार्ग खुंटणार आहे. त्याचा फटका लाखो ठाणेकरांना बसणार असून त्यांना नादुरुस्त बसमधूनच रडतखडत प्रवास करावा लागणार आहे. 

महापालिका प्रशासनावर यापूर्वी संकरा नेत्रालयाला जमीन देण्यावरून विरोधकांकडून टीका झाली होती. त्या वेळीही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. संकराच्या विरोधात फलकबाजीही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर संकरा नेत्रालयाच्या जमिनीचा मार्ग मोकळा झाला होता. आता टीएमटीच्या ठेक्‍यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून होत असल्याने महापालिका आयुक्त व्यथित झाल्याचे कळते. आज महापालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी टीएमटीच्या ठेक्‍यावरून प्रशासनाला नाहक बदनाम केले जात असेल तर तो रद्द का करू नये, अशी विचारणा टीएमटीचे व्यवस्थापक उपायुक्त संदीप माळवी यांना केल्याचे समजते. 

ठाणेकरांचा प्रवास रडतखडतच 
महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारे ठेका रद्द झाल्यास नादुरुस्त बस भंगारात जातील. ठाण्यातील प्रवाशांसाठी सुमारे 150 बस रस्त्यावर उतरवण्याच्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसेल. त्याचा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसणार आहे. कारण टीएमटीच्या ताफ्यात तत्काळ 150 बस नव्याने येणे शक्‍य नाही. परिणामी ठाणेकरांना रडतखडतच प्रवास करावा लागणार आहे. अशा वेळी किमान कोणी ठेकेदार महापालिकेच्या किमतीमध्ये बस रस्त्यावर उतरवण्यास तयार असल्यास त्याचा सकारात्मक विचार करणे गरजेचे होते; पण त्यानंतरही त्या विषयावरून राजकारण सुरू असल्याने प्रसंगी मंजूर झालेला ठराव विखंडित करण्याची भूमिका महापालिका आयुक्त घेण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: 50 percent bus mishap