Mumbai AC Local : मध्य रेल्वेची एसी लोकल सुसाट; प्रवाशांची संख्या १ कोटीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai AC Local : मध्य रेल्वेची एसी लोकल सुसाट; प्रवाशांची संख्या १ कोटीवर

Mumbai AC Local : मध्य रेल्वेची एसी लोकल सुसाट; प्रवाशांची संख्या १ कोटीवर

मुंबई : एसी लोकलचे तिकीट भाड्यात ५० टक्के कपात केल्यानंतर मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत एसी लोकल प्रवाशांची संख्या एक कोटीवर पोहचली आहे.

वातानुकूलित (एसी) लोकल सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने मे २०२२ पासून दैनंदिन तिकीट दरात५० टक्केपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे एसी लोकल प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. याशिवाय मध्य रेल्वेने प्रथम श्रेणी त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकीटधारकांना सप्टेंबर 2022 मध्ये अतिरिक्त भाडे भरून वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

याशिवाय एसी लोकल फेऱ्या सुद्धा वाढविण्यात आलेल्या आहे. सध्या, मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण / बदलापूर / टिटवाळा या उपनगरीय विभागात ५६ वातानुकूलित सेवा चालविण्यात येत आहे.

महिना - प्रवासी संख्या

एप्रिल २०२२ - ५ लाख ९२ हजार ८३६

मे २०२२ - ८ लाख ३६ हजार ५००

जून २०२२ - ११ लाख ३ हजार ९६९

जुलै २०२२ - १० लाख ७९ हजार ५०

ऑगस्ट २०२२ - १२ लाख ३७ हजार ५७९

सप्टेंबर २०२२ - १३ लाख ८२ हजार ८०६

ऑक्टोबर २०२२ - १२ लाख ७४ हजार ४०९

नोव्हेंबर २०२२ - १२ लाख ५३ हजार ८९६

डिसेंबर २०२२ - १२ लाख ३९ हजार ४१९