पाचशे, दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा मुंबईत जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - कोलकत्यातून 57 लाखांच्या बनावट नोटा पकडल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पहाटे डोंगरी पोलिसांनी नाकाबंदीमध्ये 47 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत, त्यामुळे नोटाबंदीनंतर पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा मुंबईतही पोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी वकार अहमद इरफान अन्सारी (वय 21) याला अटक करण्यात आली असून, तो भायखळा येथील रहिवासी आहे. डोंगरी पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून वाडीबंदर पुलाजवळ नाकाबंदी केली होती. अन्सारी हा पहाटे स्कूटरवरून तेथून जात असताना पोलिसांनी त्याला अडवले. त्याची झडती घेतली असता एक बनावट नोट सापडली. त्यामुळे त्याला नोटेबाबत विचारले असता अन्सारी घाबरला. त्यानंतर स्कूटरमधील एका खाकी पाकिटात पाचशे व दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या. तपासणीत त्याही बनावट आढळल्या. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून अन्सारीला पोलिसांनी अटक केली. अन्सारीकडून दोन हजारच्या 21 व पाचशे रुपयांच्या 11 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. नोटाबंदीनंतर नव्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्यानंतर मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पकडण्याची ही पहिली वेळ आहे.

Web Title: 500, 2000 rs. bogus currency seized