
मुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर माजला आहे. मुंबई शहरात या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झालेला आहे. त्यातच आता एक कौतुकास्पद बातमी समोर आली आहे. मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयात सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह गर्भवती मातांची यशस्वी प्रसूती करण्यात आलीय. आता हा आकडा आता 500 वर पोहोचला आहे. नायर रुग्णालयाच्या प्रसूती विभागातील डॉक्टरांनी यासाठी विशेष मेहनत आणि प्रयत्न करुन या प्रसूती केल्यात. या 500 कोरोना पॉझिटीव्ह गर्भवती मातांनी 503 निगेटीव्ह बाळांना जन्म दिला आहे.
नायर रुग्णालयात झालेल्या यशस्वी प्रसूतींची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली असून याबाबतचे आर्टिकल फिगो इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र या अधिकृत जर्नलमध्ये प्रसिद्ध केले जाणारेय.
नायर रुग्णालयात 14 एप्रिलपासून आतापर्यंत एकूण 723 गर्भवती महिलांवर उपचार केलेत. त्यातील, 656 मातांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर, 500 गर्भवती महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. या 500 कोविड पॉझिटीव्ह मातांनी 503 निगेटीव्ह बाळांना जन्म दिला आहे. यात 191 सिझेरियन प्रसूती झाली आहे. तर, एक तीळं, आणि 8 जुळ्या बाळांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्व यशस्वी प्रसूती करण्यात प्रसूती विभागातील डॉक्टरांना मोठं यश आल्याची प्रतिक्रिया
नायर रुग्णालय प्रसूती विभागाचे कोविड 19 नोडल अधिकारी डॉ. नीरज महाजन यांनी दिली आहे.
रुग्णालयातील प्रसूती विभागातील डॉ.अनुरुपा नायक यांनी ही 500 वी यशस्वी प्रसूती केली आहे. नायर रुग्णालयातील डाॅक्टरांनी केलेल्या या यशस्वी प्रसूतींची आणि आव्हानांची दखल घेतली गेली असून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र ( International Federation of Obstetrics and Gynecology) या जर्नलमध्ये याबाबतचे आर्टिकल प्रसिद्ध केले जाणार आहे. याबाबतची अत्यावश्यक आणि अधिकृत माहिती देण्यात आली असल्याचंही डॉ. नीरज महाजन यांनी सांगितलं.
आज सकाळी 10 वाजून 04 मिनिटांनी कोरोना पॉझिटीव्ह गर्भवती मातेची यशस्वी प्रसूती झाली आहे. त्यामुळे, कोरोना पॉझिटीव्ह गर्भवती मातांच्या यशस्वी प्रसूतीचा 500 चा टप्पा पार झाला आहे. तर, 500 गर्भवती मातांनी 503 कोरोना निगेटीव्ह बाळांना जन्म दिला आहे. रुग्णालयात रुग्ण आणण्यापासून ते मातेची यशस्वी प्रसूती होईपर्यंतचे संपूर्ण काम हे प्रसूती विभागातील डॉक्टर्स करतात. याच कामाची
दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली असून याबाबतचे आर्टिकल इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र या अधिकृत जर्नलमध्ये प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती डॉ. नीरज महाजन यांनी दिली.
आतापर्यंत वयोवृद्ध, गर्भवती महिला , दिर्घ आजार असणार्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत होते. आतापर्यंत कोणत्याही रुग्णालयात एवढ्या कोरोना पॉझिटीव्ह गर्भवती महिलांची यशस्वी प्रसूती झाली नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
500 मातांनी 503 बाळांना जन्म दिला. त्यात आठ जुळी आणि एक तीळी बालके जन्माला आली. त्यात आधी काही बालके कोरोना पॉझिटिव्ह आली होती.
त्यांची सर्वांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात ती बालके कोरोना निगेटीव्ह आली. जन्म झाल्यानंतर मातेने बाळाला हाताळताना विशेष काळजी घेतली पाहिजे. बाळ आधी निगेटीव्ह आले तरी ते हाताळण्यातून पॉझिटिव्ह येऊ शकते. गर्भात किंवा स्तनपान केल्यानंतर बाळाला संसर्ग होत नाही, असं बालरोगतज्त्र डॉ. सुषमा मलिक म्हणाल्या आहेत.
संपादनः पूजा विचारे
500 deliveries positive mothers in nair hospital mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.