दहा महिन्यांत पाचशेहून अधिक मुली ठाण्यातून बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील बालकांवरील होणाऱ्या अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यात एकूण ९० टक्के दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच या वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत अपहरण झालेल्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे - ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील बालकांवरील होणाऱ्या अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यात एकूण ९० टक्के दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच या वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत अपहरण झालेल्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण २७३ मुलांपैकी ६१ मुले आणि ५३० मुलींपैकी १७२ मुली सापडल्या नसून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाणे पोलिस आयुक्तालयात येत्या १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत बालकांची सुरक्षितता या संदर्भात जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 500 plus girls missing in thane crime