कठीण धड्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, मुंबईत लवकरच ५ हजार खाटांचं कोविड रुग्णालय

कठीण धड्यानंतर सरकारचा मोठा निर्णय, मुंबईत लवकरच ५ हजार खाटांचं कोविड रुग्णालय

मुंबईः कोरोनानं सर्वत्र कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतो. प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जाताहेत. कोरोना व्हायरससह अन्य आजारांचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत जगातील सर्वात मोठं रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच हजार बेड्सचं  संसर्गजन्य रोग रुग्णालय विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना २० एकर जागेची पाहणी करण्यास सांगितलं आहे. 

कोविड-१९ प्रसार झपाट्यानं वाढ गेला. त्यात मुंबई शहरात या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढ गेला. यामागे एक कारण म्हणजे, शहरात रुग्णालयांची संख्या कमी प्रमाणात जाणवली. या संसर्गजन्य रोगावर उपचारासाठी मुंबईत लोअर परेल येथील कस्तुरबा रुग्णालय आहे. जिथे पूर्णतः या व्हायरसवर उपचार केले जातात. मात्र या सुरुवातीला हा रुग्णालयात केवळ १२० बेड्सची उपलब्धता होती. 

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच राहिला. त्यावेळी कस्तुरबामध्ये एकही जागा शिल्लक राहिली नाही. त्यानंतर मुंबईत सेव्हन हिल्स रुग्णालयात कोविडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात पालिकेनं बराच वेळ घेतला.  तोपर्यंत मुंबईत वरळी आणि धारावीसारखा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. 

एकीकडे कोरोना रुग्ण वाढत होते आणि शहरात बेडची कमतरता भासू लागण्यास सुरुवात झाली होती. याच काळात बेडची कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा जीव गेला. बऱ्याच रुग्णांचा केवळ बेडची प्रतिक्षा करता करता मृत्यू झाला.  बुधवारपर्यंत मुंबईत ८५१९ मृत्यू नोंदले गेले असून एकूण प्रकरणे २,०९,९७८ इतकी आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी मुख्य सचिव संजय कुमार आणि महानगरपालिका आयुक्त आय एस चहल यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर सर्वप्रथम चर्चा केली. 

बुधवारी चहल म्हणाले की, रुग्णालय मुंबई किंवा मोठ्या मुंबई महानगर प्रभागात बांधलं जाईल. संपूर्ण एमएमआर सुविधेत सहज प्रवेश करण्यास सक्षम असावा, असं ते म्हणाले. 

मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले, कोरोना व्हायरसनं एक कठोर धडा शिकवला आहे आणि संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा विकसित करणं आता सर्वप्रथम प्राधान्य आहे. या योजनेत एक बहुउद्देशीय सुविधा विकसित केली जाईल जी अल्प सूचनेवर संसर्गजन्य रोग रूग्णालयात रुपांतरित होऊ शकेल, असंही त्यांनी सांगितलं. 

मुंबई महापालिकेचा आरोग्याचा अर्थसंकल्प हा ४२६० कोटी रुपयांचा असून गेल्या वर्षीपेक्षा तो १५ टक्कय़ांनी जास्त आहे. गेल्या वर्षी पालिकेचे आरोग्याचा अर्थसंकल्प हा ४१५१ कोटींचा होता. आगामी वर्षांत पालिकेने गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ५०२ कोटींची व्यवस्था केली तर मुलुंडच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयासाठी ४५८ कोटी आणि भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ५९२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

5,000 bed infectious diseases hospital mumbai Uddhav Thackeray

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com