यशस्वी वैमानिक होऊन बापाचं कर्ज फेडणाऱ्या 'या' महिलेची यशोगाथा नक्की वाचा

पूजा विचारे
Thursday, 23 July 2020

आज आम्ही तुम्हाला वैमानिक रितू राठी-तनेजा यांच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. रितू या सोशल मीडियावरही तितकीच खूप अॅक्टिव्ह आहेत जितके त्या त्यांच्या खऱ्या आयुष्यात आहेत.

मुंबईः आजपर्यंत आपण UPSC आणि IAS अधिकाऱ्यांच्या यशोगाथा ऐकल्या आणि वाचल्याही असतील. आज आम्ही तुम्हांला अशी एक यशोगाथा सांगणार आहोत, जी नक्कीच तुमच्या डोळ्यात चटकन पाणी आणेल. आज आम्ही तुम्हाला एका यशस्वी वैमानिक महिलेची यशोगाथा सांगणार आहोत. सध्याच्या जगात अजूनही मुलगी ही आई-वडिलांसाठी एक जबाबदारी आणि एक ओझं अशाच पद्धतीनं पाहिलं जातं. मात्र अशा परिस्थितीही नातेवाईकांचा विरोध जुगारुन या महिलेनं आकाशात गगन भरारी घेतली आहे. ती देखील यशस्वीरित्या. 

रुढी-परंपरांना छेद देऊन या महिलेनं उंच भरारी जरी घेतली असेल तरी त्यांच्या वाटचालीमध्ये कोणत्या समस्या आल्या आणि त्यावर त्यांनी कशी मात केली हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 

आज आम्ही तुम्हाला वैमानिक रितू राठी-तनेजा यांच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. रितू या सोशल मीडियावरही तितकीच खूप अॅक्टिव्ह आहेत जितके त्या त्यांच्या खऱ्या आयुष्यात आहेत. रितू सांगतात की, वैमानिक होईपर्यंतचा माझा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मुलीला शिकवण्यापेक्षा तिचं लग्न करुन द्या असे सांगणारे नातेवाईक त्यांच्याही आयुष्यात आले. मात्र या सगळ्यांचा विरोध पत्कारुन त्यांच्या आई वडिलांना मोठ्या कष्टानं त्यांना शिकवलं. त्यांच्या शिक्षणात कसलीही कसर पडणार नाही याची खबरदारी त्यांच्या पालकांनी घेतली. 

अधिक वाचाः  व्हिडिओ: कूपर रुग्णालयात तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयातच धिंगाणा

शाळेत असताना वैमानिक होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून त्यांनी आकाशात उंच भरारी घेण्याचं निश्चित केलं. रितू यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, आपण अशा समजात जगत आहोत जिथे आपल्याला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आधी घरं ते समाज असा संघर्ष करावाचा लागतो. 

हेही वाचाः अमर प्रेम कहाणी! पडिक भानुशाली इमारतीतून तब्बल पाच दिवसांनंतर 'यांची' सुटका

रितू यांनी मनाशी वैमानिक होण्याचं स्वप्नं एकदम घट्ट केलं होतं. त्यामुळे ज्या ज्या समस्या आल्या त्यांना त्याला तोंड दिलं. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या लग्नासाठी पैसे साठवले होते. ते पैसे त्यांनी त्यांच्याकडून मागून घेतले आणि वैमानिकाचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतल्या एका संस्थेत फॉर्म भरला. अमेरिकेतून दीड महिन्यांचं ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर भारतात रितू यांना सुरुवातीला कुठेच नोकरी मिळत नव्हती. त्यात त्यांच्यावर मध्येच दुःखाचा डोंगर कोसळला. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर होता. 

त्यात मदत करण्याऐवजी नातेवाईकांनी टोमणे मारण्यास सुरुवात केली तसंच वडिलांनाही सुनावलं. मुलगी ओझं आहे तिचं योग्य त्या वेळी लग्न करुन दिलं असतं तर आजही वेळ आली नसती, असे टोमणे नातेवाईक मारु लागले. 

हेही वाचाः व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरिक्षेची अनिश्चितता; परिणामी अन्य पदवी अभ्यासक्रमांचा कट-ऑफ वाढणार?

हीच परिस्थिती बघून मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पार्ट टाइम नोकरी करुन मी सात तास अभ्यास करायचे. त्याचवेळी एक एअरलाईन कंपनीतून मला वैमानिकाच्या नोकरीची ऑफर आली आणि मी कामावर रुजू झाले. गेल्या ४ वर्षांच्या प्रवासात मला ६०वेळा वैमानिक म्हणून स्वतः विमान हाताळण्याची संधी मिळाली. तसंच त्यानंतर मी कॅप्टनपदावर आले. कॅप्टन झाल्याचा आनंद आणि तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण होता, असं रितू सांगतात. 

लग्न करुन हुंडा देण्याऐवजी मुलीला शिकवून वैमानिक केल्याचा आनंद आजही माझ्या वडिलांना आहे. आज मी वैमानिक असल्याचा त्यांना सर्वात जास्त गर्व आहे. आईच्या निधनानंतर वडिलांवर कर्जाचा डोंगर होता. नोकरीला लागल्यानंतर सर्व कर्ज मी फेडलं. आजही माझ्या वडिलांना माझा खूप अभिमान असल्याचं रितू सांगतात. 

Ritu Rathee Taneja successful pilot popular celebrity Youtube videos


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ritu Rathee Taneja successful pilot popular celebrity Youtube videos