जेम्सने रात्री राबियाकडे तिचा मोबाईल मागितला, तिने थेट नकार दिला; पुढे जे घडलं...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

मुंबई - मुंबईत दिवसागणिक गुन्हे  घडत असतात. या प्रत्येक गुन्ह्यांमागे वेगवेगळी कारणं असतात. वेगवेगळी मोडसऑपरेंडी असते. नुकताच मुंबईतील चेंबूर परिसरातून एका खुनाची घटना समोर आलीये चेंबूरच्या RCF पोलिसांनी याबाबत माहिती दिलीये. ही घटना आहे एका ५१ वर्षीय इसमाने आपल्याच पत्नीचा खून केल्याची. या खुनाचं कारण ऐकाल तर तुम्हाला मोठा शॉक बसेल. स्वतःच्या पत्नीने मोबाईल देण्यास नकार दिला म्हणून या इसमाने आपल्या बायकोचा खून केल्याचा जेम्सवर आरोप आहेत. 

मोठी बातमी -  पोलिसांचं काम झालं कमी, आलं कोरोनाचे रुग्ण ओळखणारं विशेष हेल्मेट

सदर घटना रविवारी रात्री चेंबुरमधील म्हाडा कॉलनीत घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. रविवारी जेम्स जॉन करय्या खूप दारू पिऊन आपल्या घरी आला. घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीकडे म्हणजे राबिया जेम्स करय्या कडे तिचा मोबाईल फोन मागितला. राबियाने, आपल्या पत्नीने मोबाईल देण्यास नकार दिल्याने जेम्सला प्रचंड राग आला. राबिया आपल्याला नाही बोलतच कशी हा राग डोक्यात घालून त्याने सर्वात प्रथम घरात शिवीगाळ करायला सुरवात केली. यानंतर जेम्सने स्वयंपाकघरातील चाकूने राबियावर सपासप वार केलेत. सदर घटनेत राबियाचा त्याचक्षणी मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.  आपली पत्नी आता जिवंत नाही पाहून जेमन्स पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र शेजारी आणि घरातील काही माणसांनी जेम्सला पोलिसांच्या स्वाधीन केलं. 

VIDEO : "कोरोना गो... गो कोरोना..." रामदास आठवलेंचा 'हा' व्हिडीओ तुफान व्हायरल...

पोलिसांनी याबाबत माहिती देताना जेम्सवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केलीये. यामध्ये ३०२ अन्वये खुनाचा देखील गुन्हा नोंदवला गेलाय. राबिया ही जेम्सची दुसरी बायको असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं. जेम्सची पहिली बायको मानखुर्दमध्ये राहत असल्याचं RCF पोलिसांकडून समजतय.

51 years old husband attacked his wife for not getting her mobile in chembur 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 51 years old husband attacked his wife for not getting her mobile in chembur