VIDEO : "कोरोना गो... गो कोरोना..." रामदास आठवलेंचा 'हा' व्हिडीओ तुफान व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

मुंबई - जगभरात कोरोनाची प्रचंड दहशत आहे. अशात कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि कोरोना पूर्णपणे जात नाही तोवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. वैज्ञानिकांकडून देखील कोरोनावर लस शोधून काढण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. भारतात विविध स्तरांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम देखील घेतले जातायत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कोरोनाला भारताबाहेर जाण्यास सांगितलंय. 

मोठी बातमी - कोरोना प्रतिबंधासाठी HIV ची लस ठरतेय गुणकारी ?

एखाद्या घटनेवर किंवा व्यक्तीवर चटकन आपल्या खास शैलीत कविता करणारे खासदार रामदास आठवले आपल्याला माहित आहेत. देशभरातून आणि जगभरातून कोरोना निघून जावा म्हणून त्यांनी थेट कोरोनालाच 'निघून जा' असं सांगितलंय. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत रामदास आठवले 'गो कोरोना, करोना गो.." असं म्हणताना पाहायला मिळतायत.    

मोठी बातमी - डेटॉलने हातपाय धुतल्याने कोरोनाचे विषाणू मरतात?

मुंबईमध्ये करोनासंदर्भात काही चिनी नागरिक प्रबोधनात्मक माहिती देत होते. जनजागृती कार्यक्रमात हे परदेशी नागरिक कोरोना संदर्भात बॅनर घेऊन उभे होते.  हा कार्यक्रम पार पडत असताना रामदास आठवले यांनी सदर नागरिकांची भेट घेतली. भारत आणि चीन संबंध दृढ होण्यासाठी रामदास आठवले यांनी चिनी नागरिकांची भेट घेतल्याचं बोललं जातंय. यामध्ये चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई हेही यावेळेस उपस्थित होते.

यावेळी रामदास आठवेल यांनी "कोरोना गो... गो कोरोना.. गो करोना... करोना गो..." अशा घोषणा दिल्यात. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. 

RPI leader ramdas athawales go corona corona go video goes viral

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPI leader ramdas athawales go corona corona go video goes viral